Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा

International Award : सद्गुरू योगीराज डॉ. मंगेशदा यांना 'विश्व लीडर डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026' प्रदान करण्यात आला आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 08:57 PM
International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा

International Award : सद्गुरू डॉ. मंगेशदा यांचा लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, भारताचा शिरपेचा मानाचा तुरा

Follow Us
Follow Us:
  • भव्य सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
  • लंडन येथे पार पडला सोहळा
  • एकता अन् एकात्मतेचा संदेश
 

सद्गुरू मंगेशदा क्रिया योग फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू योगीराज डॉ. मंगेशदा यांना ‘विश्व लीडर डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2026’ (International Award) प्रदान करण्यात आला आहे. लंडनमध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.
समाजसेवेच्या क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगभरातील अनेक मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या भव्य पुरस्कार सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यामध्ये विश्व लीडर टेकमीडियाचे संचालक शिरीष बी. रामटेके, मेफेअरचे बॅरन तसेच यूके संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर, ब्रिटिश-भारतीय उद्योगपती व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कृष्णा पुजारा, माजी आमदार विजयभाई गिरकर, पद्मश्री डॉ. कल्पना सरोज यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते.

 

एकता अन् एकात्मतेचा संदेश

हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. मंगेशदा म्हणाले, महान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्वप्न होते ‘एकता आणि एकात्मता’ ते आपण सर्वांनी एकत्र येऊन हा प्रवास असाच पुढे सुरू ठेवला तरच शक्य आहे. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचेही आभार मानले.

गेली अनेक दशके सद्गुरू डॉ. मंगेशदा यांनी क्रियायोगाचे संशोधन, योगशास्त्राचा शास्त्रीय दृष्टिकोन आणि योगाचा प्रसार यासाठी अथक कार्य केले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत योगशास्त्र पोहोचविण्यासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवता, नि:स्वार्थ प्रेम आणि क्षमाशीलतेचा संदेश ते देत आहेत.

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळावर केंद्रीय कृषीमंत्री अॅक्शन मोडवर, ‘या’ दिवशी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार

विविध पुरस्कारांनी सन्मानित

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी दखल घेतली आहे. मॉरिशस येथे ‘योग शिरोमणी’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. इंडोनेशियातील बाली येथे ‘ग्लोबल इंडियन अचिव्हर अवॉर्ड’, तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम अवॉर्ड, लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘महात्मा गांधी अहिंसा सन्मान’, इंडो-व्हिएतनाम अवॉर्ड, योग रत्न पुरस्कार आणि इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ‘आय प्लेज, वी प्लेज’ अभियानाच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

Maharashtra Drought: जावळीचा Trigger-1 मध्ये समावेश करा; दुष्काळी सवलतींसाठी शिवसेनेची मागणी

‘विश्व लीडर डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२६’ हा त्यांच्या प्रदीर्घ समाजसेवा, योगप्रसार आणि मानवकल्याणाच्या कार्यातील आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे. योग, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचविणाऱ्या सद्गुरू डॉ. मंगेशदा यांच्या कार्याचा लंडनमध्ये झालेला हा सन्मान निश्चितच त्यांच्या शिष्यांसाठी आणि त्यांच्या कार्याशी जोडलेल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

Web Title: Sadguru dr mangeshda honoured international award in london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • awarded
  • dr babasaheb amdekar
  • London

संबंधित बातम्या

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान
1

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.