आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश
मुंबई : सकल हिंदू समाजाच्या आक्रोश रॅली तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला आहे. मुस्लिम नेत्यांना शिवीगाळ करणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा अशी मागणी याचिका कर्ते जमील मर्चन्ट यांनी आपल्या याचिकेत मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सूचीबद्ध केले आहे, पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. गेल्या महिन्यात मालाड पश्चिम मालवणी परिसरात सकल हिंदू समाजातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते.
नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुस्लीम समाज आणि मुस्लिम नेत्यांना शिवीगाळ केला. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. स्थानिक पोलिसांनी केवळ आयोजकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. अधिवक्ता एजाज मकबूल यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 3 मार्च रोजी मालाड पश्चिम मालवणी परिसरात सकल हिंदू समाजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात आमदार नितेश राणेही उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान त्याने केवळ मुस्लिमांनाच लक्ष्य केले नाही तर दोन समुदायांमध्ये द्वेषही पसरवला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील याचिकेची सुनावणी 5 एप्रिल रोजी बोलावली होती, ज्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्याशिवाय याचिकाकर्त्यांचे वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी, इजाज मकबूल, बुरहान बुखारी, सुश्री एस. आलम, सैफ झिया आणि फैजल मसूद उपस्थित होते. वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने जमील मर्चंटने दाखल केलेल्या याचिकेची यादी करण्याचे आदेश दिले.