Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? फडणवीसांंनी विरोधकांना सुनावले, जाणून घ्या नेमके काय झाले सभागृहात

  आजच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवातीलाच कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी महात्मा गांधीवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत तत्काळ अटकेची मागणी केली. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजींना तत्काळ अटक केली जाईल, असे सांगितल्यानंतर विरोधकांनी संभाजी भिडे यांना गुरुजी म्हणू नये असा आग्रह धरला. त्यावेळी फडणवीस यांनी ते आम्हाला गुरुजी वाटतात तुमची काय अडचण आहे का? असे विरोधकांना सुनावत यावर काही आक्षेप असण्याची गरज नसल्याचे सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 02, 2023 | 05:51 PM
संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? फडणवीसांंनी विरोधकांना सुनावले, जाणून घ्या नेमके काय झाले सभागृहात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी भिडेंच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले. कॉंग्रेसने जोरदार विरोध प्रदर्शन करीत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई होणार परंतु त्याचबरोबर कॉंग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरीतून सावरकरांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावरसुद्धा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. यावेळी विरोधकांनी संभाजी भिडेंचा उल्लेख करताना गुरुजी असा केल्याने, यावर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला त्यामुळे काही वेळ सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला.

महाराष्ट्रासह देशभरातून संतापाची लाट

महात्मा गांधीबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसने राज्यभर आंदोलन करीत आहे. दरम्यान, आता भिडेंच्या कारवाईसाठी काँग्रेस आक्रमक झाली असून, आज विधीमंडळ अधिवेशनात बोलताना, “संभाजी भिडे जिथे असेल तिथून त्याला अटक करा”, अशी मागणी काँग्रेस आमदार व विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाची भिडेंवर कारवाई करण्याची जोरदार मागणी

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करीत आहेत. परंतु, भाजपचे सरकार त्यावर कारवाई करीत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपने संभाजी भिडेला दिले आहे का? असा संतप्त सवाल करीत भिडेंवर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Sambhaji bhide we think guruji what is the problem fadnavis told the opposition know exactly what happened in assembly monsoon session nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 05:47 PM

Topics:  

  • sambhaji bhide

संबंधित बातम्या

“आंबा खाऊन मुलं होतात अन् सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा ….; संभाजी भिडे यांची अजब वक्तव्ये, चर्चांना उधाण
1

“आंबा खाऊन मुलं होतात अन् सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा ….; संभाजी भिडे यांची अजब वक्तव्ये, चर्चांना उधाण

शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन वाद-विवाद सुरु; संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याला समितीने दिले चोख प्रत्युत्तर
2

शिवराज्याभिषेक सोहळ्यावरुन वाद-विवाद सुरु; संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याला समितीने दिले चोख प्रत्युत्तर

संभाजी भिडे पुन्हा बोलले! 6 जून रोजीचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करण्याची मागणी
3

संभाजी भिडे पुन्हा बोलले! 6 जून रोजीचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करण्याची मागणी

‘भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे’; विजय वडेट्टीवार यांचा टोला
4

‘भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे’; विजय वडेट्टीवार यांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.