Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार! मेळाव्यात साधक-भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग

महाशिवरात्रीनिमित्त मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार पडला. १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या मेळाव्यात विविध ठिकाणांहून साधक-भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पावनक्षेत्र मासाळवाडी येथे भव्य आणि भक्तिमय वातावरणात महावैष्णव मेळावा उत्साहात पार पडला. सच्चिदानंद संत श्रीपादबाबांच्या कृपाशिर्वादाने आणि गुरुवर्य ह.भ.प. श्री पुरुषोत्तम रायजाधव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आटपाडी पंचक्रोशीतील साधक-भक्त आणि भाविकांच्या सहकार्याने पार पडलेला हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिभावाने साजरा झाला.

Washim News : परीक्षेच्या सीसीटीव्ही फुटेजचे जतन करा! मंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देश

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक उपक्रमांसोबतच समाजजागृतीचा ठोस संदेश देण्यावर भर देण्यात आला. मंदिर परिसरात आषाढी एकादशी २०२५ रोजी उद्घाटन झालेली देशी खिल्लार गोमाता संवर्धनासाठीची गोशाळा हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. गोसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधत या ठिकाणी एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळत होती.

मेळाव्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच बेळगाव परिसरातून दिंड्या आणि साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजनाने झाली. त्यानंतर शिस्तबद्ध दिंडी सोहळा पार पडला. धर्मध्वजारोहण करून गुरुवर्य रायजाधव बाबांच्या शुभहस्ते धर्ममंडपाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठ पूजन आणि वंदे मातरम्‌च्या गायनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.

ब्रह्ममुहूर्तावर विश्वात्मकेंश्वर महादेवाच्या अभिषेकावेळी डमरू, शंखनाद, घंटानाद आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. “ॐ नमः शिवाय”च्या जपात आणि भजन-चिंतनात प्रत्येक भक्त तल्लीन झाला होता. या क्षणी उपस्थित भाविकांच्या अंतःकरणात शिवभक्तीचा ओलावा स्पष्ट जाणवत होता.

मेळाव्यात पहाटेपासून परिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ यांसारख्या सेवा सातत्याने सुरू होत्या. यामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन, शंका-समाधान, अनुग्रह-प्रबोधन या गोष्टींसोबतच वृक्षसंवर्धन आणि गोमाता संवर्धन याबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. “गोसेवा हीच ईश्वर सेवा” आणि “ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

देशी गोमाता आणि देशी वृक्षसंपदा ही भारतीय संस्कृतीची मुळे असून, त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सध्या राजकीय आणि सामाजिक अनास्थेमुळे या दोन्हींची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे केवळ धार्मिक कार्यक्रम न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून दिसून आला.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून पांडवकडा (मुंबई), सिद्धोबा डोंगर (कोल्हापूर), बोपदेव घाट (पुणे), जरंडेश्वर (सातारा), पंढरपूर परिसर तसेच मासाळवाडी व इतर भागात एक लाखांहून अधिक देशी वृक्षांची लागवड व संगोपनाचे कार्य सुरू आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.

मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी उद्योजक आणि जिल्हा परिषद सदस्य विनायकराव मासाळ यांनी उपस्थिती लावली. त्यांचा सत्कार गुरुवर्य रायजाधव बाबा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विश्वात्मकेंश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तसेच गोशाळा महाराष्ट्रात आदर्श ठरेल, यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

या कार्यक्रमात अनेक गोप्रेमी आणि भाविकांनी गोदान जाहीर केले. काहींनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त, तर काहींनी पितरांच्या स्मरणार्थ गोदान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. प्रत्येक घरात देशी गोवंश जपावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीच्या दिवशी ‘काला’ करून मेळाव्याची सांगता झाली. परतीच्या वेळी साधक-भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि पुन्हा भेटण्याची आस स्पष्ट दिसत होती. भक्ती, सेवा आणि समाजजागृती यांचा संगम घडवणारा हा महावैष्णव मेळावा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

Web Title: Sangali news grand mahavaishnav gathering at masalwadi celebrated with devotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Sangali News

संबंधित बातम्या

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न
1

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.