तासगाव तालुक्यातील सावळज-डोंगरसोनी मार्गावर प्रशासनाने मोठ्या दिखाव्याने केलेली वृक्षलागवड अक्षरशः तडफडत आहे. पावसाळा ओसरताच रोपांना पाण्याचा थेंबही न मिळाल्याने ती वाळून जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत.
सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये प्रभाग समिती तीन अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान भुयारी गटार रुपये 263 कोटीची योजना 15 सप्टेंबर 2023 पासून महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कामास सुरू झालेली आहे.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात जर नवीन महा ई सेवा केंद्राला परवानगी दिली तर त्याचे भवितव्य हे उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, असा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे.
जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारणीसाठीचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहायचं झालं तर या प्रकल्पाने स्थानिक व्यापारांना चालना मिळेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.
मिरज तालुक्यामधील बेडग गावामध्ये सध्या आरोग्य उपकेंद्राचे काम चालू आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह गटार, रस्ते आणि लाईटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
पावसाने धरलेला जोर आणि कोयनेसह इतर धरणातून होणारा मोठ्या प्रमाणात विसर्ग यामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 43.7 फूट इतकी वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह बांधण्याचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करावी,अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे.