शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले, अनिल घनवट, कैलास तवार यांनी देखील उसाच्या एफआरपीमध्ये केवळ शंभर रुपये वाढ, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचे म्हटले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ २६ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
महाराष्ट्रासह सर्व ऊस उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी केंद्र सरकार १९६६ च्या 'ऊस (नियंत्रण) आदेशात' (Sugarcane Control Order, 1966) सुधारणा करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
काही प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ऊसाला फटका बसला आहे. परिणामी देशातील साखर उत्पादनात घट होऊ शकते, असे समजते. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक भारताकडून निर्यात मर्यादित होईल.
काही प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी २०२५-२६ हंगामात देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडून ऊसाला प्रति टन 3101 रुपयांची पहिली उचल जाहीर झाली आहे. ही माहिती स्वतः अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली आहे.
ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.
एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे ऊसाचे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
जुन्या गाड्यांमध्ये फ्युएल इंजेक्टर, पंप व सील्सहे तांबे, पितळ किंवा जुन्या रबरपासून बनलेले असल्याने इथेनॉलमुळे ते पटकन गंजतात किंवा खराब होतात. इथेनॉल पाणी शोषून घेतो, त्यामुळे गंजण्याची प्रक्रिया आणखी वेगाने…
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून…
कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी रक्कम न दिलेल्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. संबंधित कारखान्यांकडून 246 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे.