कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांची आज पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी संजय राऊत आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जडणघडणेत सुद्धा त्यांचे मानाचे स्थान आहे. पक्षाची निष्ठा काय असते हे सन्माननीय नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिले आहे. माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री असणे हे माझ्यासाठी परमोच्य आहे अशी भावना त्यांची आहे. राष्ट्र प्रथम हे भाजपच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याची ब्रीदवाक्य आहे. तेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या कृतीतून सातत्याने दाखवत आले आहेत. पण ज्यांच्या रक्तातच गद्दारी आणि दलाली आहे त्या संजय राजाराम राऊतला नितीनजी गडकरी, देवेंद्र फडणवीस अशा भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता कधीच कळणार नाही अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी २०१९ मध्ये प्रयत्न केले. आमदारांच्या बैठका घेतल्या मात्र काहीच झाले नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मागे गोंडा घोळवत फिरू लागले. नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावान लोकांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही. राऊत यांनी आनंद दिघे यांचे नाव घेऊ नये. कुवत सुद्धा नाही, मुंबईतील जुना महापौर बंगला येथे तुमच्या मालकाचा मुलगा, कलाकारांना घेऊन पैसा उधळवत होता ते मान्य आहे काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.
सर्व धर्मासाठी एकच नियम हवेत, हिंदूंना एक न्याय, मुस्लिमांना वेगळा नियम का? आमचे भुजबळ यांनी यावर बोलले पाहिजे. राऊत यांची रक्त तपासणी करावी लागेल. सुधाकर भडगुजर यांनी सावध रहावे, त्यांना अडकविण्याचा प्रयत्न संजय राऊत यांचा असू शकतो. जिथे जिथे काँग्रेस सरकार आहे, तिथे हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जी स्थिती बांग्लादेशमध्ये आहे, तशीच स्थिती भारतात दिसतेय. कर्नाटकात हिंदूंची देवता गणपती बाप्पाला काँग्रेस पक्षाने पोलिसांना सांगून पोलीस व्हॅनमधून घेऊन जात आहेत असे दिसले. त्यामुळे येथील महाराष्ट्रातील हिंदूंनी सावध राहावे. महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात घ्यावे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
फडणवीस यांनी ५ वर्षात मराठा आरक्षण दिले, जे शरद पवारांना जमले नाही. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांचे समर्थन करतात आहे, ते आमच्या महायुतीचे नेते आहेत. ते रामदास कदम यांना सांगतील, संजय राऊत स्वत: हिंदू धर्म सोडला आहे. यांनी जाऊन अजाण समोर जाऊन नतमस्तक व्हावं. राऊत आणि मालकाचे रक्त हिरव झालं आहे का? याची तपासणी करावी. सुधाकर बडगुजर यांचा काटा संजय राऊत काढत नाही ना? आरक्षण घालवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जनतेत जाऊन त्याचा बुरखा फाडु असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.