मुंबई: महाराष्ट्राला नरेंद्र मोदी व अमित शहा पासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्राची लूट होत आहे. यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे. मराठी माणूस खतम करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान खोडून काढायचा आहे या दोघांना महाराष्ट्राचा उरला सूरलेला स्वाभिमान मोडून काढायचा आहे, खतम करून महाराष्ट्राला गुजरातला जोडायचे आहे म्हणून हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग अदानीच्या घशात घातली जात आहे. ही संपत्ती जरी अदानीच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शहा हेच आहेत. महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: SEBI ने F&O बाबत जारी केलं नवं सर्क्युलर, ‘या’वर लागणार लगाम, 20 नोव्हेंबरपासून नवीन नियम
अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. 2024 ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्नदोष याचा विकार झालेला आहे. मित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहे आणि ते गल्लो गल्ली महाराष्ट्रात फिरत आहे हे त्यांना शोभत नाही आहे त्यांनी राष्ट्राचा विचार करावा. 2029 मध्ये आपली सरकार राहणार की नाही हा त्यांनी विचार करावा, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शांहांवर निशाणा साधला आहे.
“नरेंद्र मोदींना त्यांच्या नियमानुसार रिटायर व्हायला लागणार. 75 वर्षावरील सर्व नेत्यांना त्यांनी निवृत्त केले. त्यानुसार त्यांनाही निवृत्त व्हावे लागणार. 2024 ला तुम्ही 240 ला थांबलेले आहात 2029 ला आपण 140 च्या खाली थांबाल, असा टोलाही त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. तसेच, स्वप्न पाहणाऱ्यांवर इडी सीबीआय रेड टाकू शकत नाही ना. या देशातून भारतीय जनता पक्षाचे अध:पतन सुरू झाले असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर; ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून करणार होते प्रवास, पण…
संजय राऊत म्हणाले, “अमित शाह ज्या पद्धतीने वारंवार ते बोलत आहेत याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीयेत त्यांच्याकडे मतदार नाहीयेत. त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आणि फक्त गद्दार नेते आहेत. पण गद्दारांकडे मतदार आणि कार्यकर्तेच नाहीत हेही अमित शहांना फार लवकर कळालेले आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, आमच्याकडे ईडी सीबीआय आहे .पैसे आहेत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.