Sant Dnyaneshwar Maharaj's palanquin arrives in Lonand Satara News
लोणंद : महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचा सोहळा सुरु झाला आहे. पुण्यातून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. आता संत ज्ञानेश्वर माऊलींची जेजुरी मार्ग पुढे मार्गस्थ झाली आहे. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीने आज दुपारी मोठया आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्य़ात प्रवेश केला .
सातारा जिल्ह्याच्या वतीने नीरा नदीच्या काठी पाडेगाव येथे माऊलींचे निरा स्नान झाल्यानंतर जिल्हा परिषद साताराच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महाराज सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळेस मोठ्या संख्येने गावकरी आणि भाविक जमले होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्ह्य़ात प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांतअधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार अजित पाटील, मनोज पवार यांनी पुष्प अर्पण करुन व पोलीस बँड पथकामार्फत विविध वाद्यवादन करुन स्वागत करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तत्पूर्वी नीरा येथे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पालखी सोहळा सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सुपूर्द केला यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , पोलीस अधीक्षक तुषार दोशी , प्रमुख विश्वस्थ योगी निरंजनाथ , सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड राजेंद्र उमप आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिली आहे.