Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetty Satara Politics: सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शेतकरी पेटले; राजू शेट्टींच्या नेतृत्वात लाँगमार्चची घोषणा

सभेत ३ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या एमआयडीसी अधिसूचनेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तेरा वर्षे हरकती मागविण्याची प्रक्रिया न राबविणारे प्रशासन अचानक जागे कसे झाले? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 04:50 PM
Raju Shetty Satara Varne MIDC Protest,

Raju Shetty Satara Varne MIDC Protest,

Follow Us
Follow Us:
  • राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरू
  • वर्णे, निगडी, देवकरवाडी आणि राजेवाडी या गावांतील सुपीक शेतजमिनी वाचवण्यासाठी एकजूट
  • निवेदने देऊनही प्रशासनाने वेळकाढूपणा केल्यामुळे शेतकऱ्यांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा.
 

Raju Shetty Satara Politics: वर्णे–निगडी परिसरातील सुपीक शेती वाचविण्यासाठी सुरू असलेल्या एमआयडीसीविरोधी जनआंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. आगामी ऐतिहासिक लॉंगमार्चपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी साहेब स्वतः या लढ्याच्या  मैदानात उतरणार असून, पुढील आठवड्यात वर्णे येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट एल्गार सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचबरोबर राज्यातील विविध पक्ष, शेतकरी संघटना व सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असून, त्यांच्या तारखा निश्चित करून वर्णे येथे भव्य सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी धनगरवाडी येथे झालेल्या विराट सभेत केली. ही घोषणा होताच घोषणांच्या गजरात संपूर्ण सभास्थळ दणाणून गेले.

धनगरवाडी येथे झालेली ही एल्गार सभा केवळ एक सभा नव्हती, तर वर्णे–निगडी एमआयडीसीविरोधातील लढ्याचे रणशिंग ठरली. पंचक्रोशीतील शेतकरी, महिला, युवक, आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी अभूतपूर्व उपस्थिती लावत हा संघर्ष आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार

सभेला संबोधित करताना राजू शेळके म्हणाले, “दिवसागणिक वाढणारा जनतेचा प्रतिसाद ही आपल्या विजयाची नांदी आहे. आज देवाच्या मंदिरात उभा राहून देवाला साक्ष ठेवून मी शपथ घेतो की, शेतकरी आणि सैनिक बांधवांची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर आपल्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा आहे. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी हा संघर्ष अखेरपर्यंत सुरू राहील.”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सचिव प्रवीण धसके यांनी महिलांची लक्षणीय उपस्थिती हे आंदोलनाचे सर्वात मोठे बळ असल्याचे सांगत, “आज माताभगिनी ज्या ताकदीने या लढ्यात सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे आम्हाला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे,” असे सांगितले. त्यांनी या आंदोलनाला सुरुवातीपासून व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमांचे टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर अभिनंदन केले.

सभेत ३ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या एमआयडीसी अधिसूचनेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तेरा वर्षे हरकती मागविण्याची प्रक्रिया न राबविणारे प्रशासन अचानक जागे कसे झाले? असा सवाल उपस्थित करण्यात आला. काही स्वार्थी घटकांच्या दबावाखाली स्थानिक महसूल व एमआयडीसी प्रशासन शासनाला दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.

यापुढे एमआयडीसीविरोधी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सामाजिक परिणाम मूल्यांकन संदर्भात स्वतंत्र सर्वेक्षण करून शासनापुढे वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय सभेत जाहीर करण्यात आला. शासनाने सिंचनासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च, सुपीक शेती, ऊस, फळबागा, भाजीपाला उत्पादन, पर्यावरणावर होणारा परिणाम, भूजल, जैवविविधता, ग्रामस्थांचे पुनर्वसन आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर होणारे दुष्परिणाम यांचा सविस्तर अहवाल शासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेरा वर्षांनंतर सुपीक शेती बळकावण्याचा डाव आखणाऱ्यांचा बुरखा फाडल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित

सभेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. त्यांनी अत्यंत तळमळीने आपली मते मांडत शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्याला ठाम पाठिंबा जाहीर केला. युवकांचा उत्स्फूर्त आणि आक्रमक सहभाग संपूर्ण सभेचे प्रमुख आकर्षण ठरला. विशेषतः युवा निवेदक सुजित काळंगे यांनी प्रभावी सूत्रसंचालनातून युवकांमध्ये संघर्षाची जिद्द आणि जनजागृती निर्माण केली.

या सभेस सुधाकर शितोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, वर्णे–निगडी पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगरवाडीच्या एल्गार सभेने आता या आंदोलनाला नवे बळ दिले आहे. पुढील आठवड्यात वर्णे येथे होणाऱ्या विराट सभेत राजू शेट्टी कोणती भूमिका मांडणार, राज्यातील आणखी कोणते वरिष्ठ नेते या लढ्यात सहभागी होणार, लॉंगमार्चची अंतिम दिशा काय असणार आणि सुपीक शेती वाचविण्याच्या या निर्णायक संघर्षात पुढचा टप्पा कोणता असणार, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Satara dhangarwadi farmer rally against midc land acquisition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • raju shetty
  • Satara

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.