
Pedgaon Seva Sankalp Abhiyan
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी योगेश कदम, सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी, विस्तार अधिकारी माधव बोईनवाड, पंचायत समिती सदस्य हनुमंतराव बोटे, उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. फार्मर कप निमित्त महिलांनी शेतीमध्ये पुढाकार घेतला आहे .याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. महिलांनी देखील त्यांची शेतीची वाटचाल स्वयंस्फूर्तीने उलगडून दाखवली. अगदी वाटेवरचे आलेले काटे बाजूला सारत आलेले अनुभव त्यांनी जितक्या गंभीरपणे; तितक्याच खुमासदार भाषेत वर्णन केले. यावेळी डॉ. पोळ यांनी महिलांना अनेक प्रश्न विचारले. त्याला त्यांनी अगदी प्रगल्भपणे उत्तरे दिली. त्यानंतर श्रीमती नागराजन यांनी देखील त्यांना काही मौलिक सूचना केल्या. जमीन प्राप्त होण्यापासून ते लागवडीपर्यंत आणि उत्पादनापर्यंत येणाऱ्या अडचणी महिलांनी विशद केल्या.
त्यावर साधक चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. अगदी भांडवल उभे करण्यासाठी पेडगावच्या बैलगाडी शर्यतीत महिलांनी स्टॉल सुद्धा उभे केले त्यातून भांडवल उभे केले हे ऐकून सर्वजण कौतुकाने भारावून गेले. त्यावर अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.पुढील वर्षी या गटाची भरभराट होऊन महिला सदस्यांची संख्या भरपूर वाढावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली. “भांडवल उभे करण्यापासून अगदी उपउत्पादने घेण्यापर्यंत” महिलांनी आपली वाटचाल निर्भयपणे व्यक्त केली. तेव्हा सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या कष्टकरी वृत्तीचे, धाडसाचे, ज्ञानाचे आणि ऐक्याचे कौतुक केले.फार्मर कपच्या निमित्ताने महिलांमधील एक मोठा कर्तृत्वाचा भाग समोर आला, अशी भावना सर्व उपस्थितांमध्ये निर्माण झाली.
विशेष कौतुक म्हणजे केवळ शेती उत्पादन नव्हे तर या महिलांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. त्यांनी वेगवेगळी शिबिरे घेतली आणि समाजासाठी विविध उपक्रम राबविले.” एक महिला मनावर आणले तर स्वतःसह गावाची प्रचंड प्रगती करू शकते याचे उदाहरण पेडगावच्या महिलांनी घालून दिले आहे” असे गौरवोद्गार डॉ प्रिया शिंदे यांनी काढले. डॉ. पोळ यांनी विविध प्रश्न विविध अंगाने विचारून या भगिनींना बोलते केले .गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी या संपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्यांनी प्रस्तावनेमध्ये या भगिनींचे भरभरून कौतुक केले .हा शेतकरी गट केवळ जिल्हाच नव्हे तर राज्यापुढे आदर्श ठरावा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.” या गटाची आणि त्या अनुषंगाने गावाची भरभराट आम्ही करू” असा विश्वास या भगिनींनी व्यक्त केला.