
Shambhuraj Desai
उपवनसंरक्षक अमोल सातपुते (दूरदृष्य प्रणालीद्वारे) कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे आदी उपस्थित होते. वन विभागाने बिबट्यांपासून संरक्षण कसे
करावे याबाबत मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देश देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, बिबट्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाचा चर खांदण्याचा जुना कार्यक्रम होता. त्या पद्धतीने बिबट्यांचा वावर असणाऱ्या गावांच्या कडेला चर खांदण्यात यावी. अलार्म सिस्टिम बसविण्यासाठी, ड्रोन व पिंजरे घेण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली.
बिबटे पकण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा
ज्या गावांमध्ये बिबटे आढळले आहेत, त्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व वन विभाग कर्मचारी यांनी मार्गदर्शक उपाययोजनांची जनजागृती करावी व प्रशासन करीत असलेल्या सूचनांची माहिती द्यावी. चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये बिबटे पकडण्यासाठी जास्तीचे पिजरे लावावेत व त्या ठिकाणी प्राधान्याने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा.