मात्र या रस्त्यालगत बांधण्यात आलेले आरसीसी गटर्स ठिकठिकाणी तुंबत असल्यामुळे गटाराचे पाणी थेट रस्त्यातूनच वाहत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे व डासांच्या प्रभावामुळे रोगराई पसरण्याची त्याचबरोबर रस्त्यात पडलेल्या – मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सबंधित विभागाने – याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यात – पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावेत व – नालेसफाई करण्यात यावी, अशी मागणी – वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
Ans: आरळा गावातील मुख्य रस्त्यावर आरसीसी गटारे ठिकठिकाणी तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याला अक्षरशः पानंदीचे स्वरूप आले आहे.
Ans: या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक, प्रवासी, विद्यार्थी आणि पादचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, घसरून पडण्याचा धोका आणि अपघाताची भीती कायम आहे.
Ans: आरळा हे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. शेडगेवाडी–आरळा हा एकमेव मार्ग चांदोली धरण व चांदोली अभयारण्याकडे जातो. त्यामुळे पर्यटक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी व कामगार यांची येथे मोठी वर्दळ असते.






