Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली, कोल्हापूरसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस; जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तरीही…

गेल्या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाल्यानं यंदा पाणी टंचाई जाणवेल, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील (Kolhapur Water Issue) पाण्याची स्थिती 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आला. जिल्ह्यातील सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2024 | 02:50 PM
सांगली, कोल्हापूरसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस; जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तरीही…
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : गेल्या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाल्यानं यंदा पाणी टंचाई जाणवेल, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतील (Kolhapur Water Issue) पाण्याची स्थिती 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आला. जिल्ह्यातील सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.

नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार, राधानगरी आणि तुळशी धरणांत जवळपास गतवर्षी इतकाच, तर काळम्मावाडी धरणात एक टीएमसीनं अधिक पाणीसाठा आहे. सध्या राधानगरी धरणात २.०४ टीएमसी म्हणजेच २६.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दूधगंगा धरणात ३.५६ टीएमसी म्हणजेच १४.८५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर वारणा धरणामध्ये ६.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस सुरू होईपर्यंत किमान पुढील दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा तीनही धरणात आहे.

शेतीसाठी १० जूनपर्यंत आणखी दोन आवर्तनं मिळण्याची शक्यता आहे. पाणीसाठा असाच राहिला आणि पावसाला लवकर सुरुवात झाल्यास शेतीसाठी उपसा बंदी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या तीनही धरणांतून विशिष्ट प्रमाणात भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नदीत विसर्ग सुरूच आहे. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही.

आजअखेर काळम्मावाडी धरणात गेल्यावर्षीपेक्षा एक टीएमसीनं अधिक, तर राधानगरी आणि तुळशीत धरणात शंभर एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी शेती आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची पुढील काळातील गरज पाहता उपलब्ध पाण्याच्या वापराचं काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.

Web Title: Satisfactory water storage in dams in the kolhapur district nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2024 | 02:50 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Water supply

संबंधित बातम्या

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
1

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
2

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा
3

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला; त्र्यंबोली मंदिरात होणाऱ्या कोहळा फोड सोहळ्याची काय आहे आख्यायिका  ?
4

अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला; त्र्यंबोली मंदिरात होणाऱ्या कोहळा फोड सोहळ्याची काय आहे आख्यायिका ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.