Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘या’ तालुक्यात निवडणुकीचा धुरळा; तब्बल 23 ग्रामपंचायतींमध्ये…

तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 11:28 AM
Maharashtra Politics: ‘या’ तालुक्यात निवडणुकीचा धुरळा; तब्बल 23 ग्रामपंचायतींमध्ये…
Follow Us
Follow Us:

रिक्त जागांचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
२३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोट निवडणूक होणार
२८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार

पाटण: पाटण तालुक्यातील थेट सरपंच, सदस्य यांचे निधन, राजीनामा, अनर्हता अथवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील ६ ठिकाणी थेट सरपंच व १७ ग्रामपंचायतींमधील सदस्य अशा एकूण २३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोट निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा निवडणूक रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.

तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. गोठणे, कराटे, ढोरोशी, किल्ले मोरगिरी, नारळवाडी, मारूल हवेली, घोटील येथील प्रत्येकी ३, गाडखोप २, नाव, बहुले, लेंढोरी, भिलारवाडी, निवी येथील प्रत्येकी १, मराठवाडी, म्हावशी येथील प्रत्येकी ४, अशा रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, दि. ७ ते सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. १७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत.

त्याच दिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वितरण व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवार, दि. २९ रोजी मतमोजणी होणार आहे. एकंदरीत पाटण तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.

Web Title: Schedule announced for by elections in 23 gram panchayats in patan taluka 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • byelection
  • gram panchayat
  • Patan News

संबंधित बातम्या

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
1

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.