Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलादपूर तालुक्यात शालेय साहित्य वाटप; कृष्णा कदम यांचे हॉस्पिटल स्थापनेचे स्वप्न

कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. संस्थापक कृष्णा कदम यांनी विद्यार्थ्यांसाठी तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2025 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पोलादपूर तालुक्यातील मोरसडे, देवळे, साखर, दिविल, मोरगिरी, चोळई आदी गावांतील विविध शाळांमध्ये कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे, माध्यमिक विद्यालय साखर, प्राथमिक शाळा दिविल व मोरगिरी आदी ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.

माऊलींना निरोप देताना जीव झाला कासावीस! लोणंदकरांचा माऊलींना साश्रू नयनांनी निरोप

या कार्यक्रमात वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर, ओंबळी विद्यालयाचे शिक्षक दीपक सकपाळ, भरत चोरगे, शुभांगी महाडिक, संदीप जाबडे, अनिल मोरे, कृष्णा सणस, दत्ता केसरकर, प्रमोद उतेकर व प्रविण महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शुभांगी महाडिक यांनी विद्यार्थ्यांना कोकण टॅलेंट्स सर्चच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन करत, UPSC आणि MPSC सारख्या परीक्षांमध्ये उतरून अधिकाऱ्यांचे स्वप्न साकार करा, असे सांगितले. चंद्रकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आठवून देत चांगले शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले. दीपक सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर आपल्या भावंडांना मदत करावी, शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी असा संदेश दिला. कार्यक्रमात प्रमोद उतेकर यांचे कार्यही गौरविण्यात आले.

Devendra Fadnavis : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

या प्रसंगी बोलताना कृष्णा कदम यांनी आपल्या भावनिक शब्दांत सांगितले की, “मी कोणावर उपकार करत नाही, ही माझी जबाबदारी आहे. माझ्या ‘वैद्यकीय मदत कक्ष’ या ग्रुपमधील 1300 जणांचे हे सामूहिक श्रेय आहे. माझं स्वप्न आहे की, माझ्या पोलादपूर तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल उभे राहावे आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारीही याच तालुक्यातील असावेत.” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे.

Web Title: School supplies distributed in poladpur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • education news
  • poladpur news

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
2

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू
3

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी
4

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.