Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यानंतर एक्स्प्रेसमधील सुरक्षेत वाढ; 24 गाड्यांत विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून, रेल्वे विभागाने सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2025 | 11:42 AM
पहलगाम हल्ल्यानंतर एक्स्प्रेसमधील सुरक्षेत वाढ; 24 गाड्यांत विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात

पहलगाम हल्ल्यानंतर एक्स्प्रेसमधील सुरक्षेत वाढ; 24 गाड्यांत विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून, रेल्वे विभागाने सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागात धावणाऱ्या २४ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.

पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. तेथे अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पुण्यासह मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर श्वानपथकांद्वारे तपासणी केली जात आहे. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना शस्त्र बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तक्रारींची नियमित दखल घेणार

पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा बलाचे निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहेत. संवेदनशील बाबीची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला दिली जात आहे. रात्रीच्या वेळी एक निरीक्षक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. विविध स्थानकांवर व गाड्यांमध्ये साध्या वेशातील विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रवाशांकडून रेल मदत या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या तक्रारींची नियमितपणे दखल घेतली जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरज स्थानकही संवेदनशील

मिरज स्थानक संवेदनशील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मिरज रेल्वेस्थानकही संवेदनशील आहे. या स्थानकात यापूर्वीही अनेकदा गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेकदा गुन्हेगारी कारवाया, लुटमारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

Web Title: Security has been increased in railway express trains after the pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध योजनांचा करणार शुभारंभ; सर्वसामान्यांना होणार फायदा…
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध योजनांचा करणार शुभारंभ; सर्वसामान्यांना होणार फायदा…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….
2

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला ४२,००० कोटींच्या कृषी योजना करणार लॉन्च; आता उत्पन्नात होणार….

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा
3

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा

रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं; पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इतक्या’ अपघातांची नोंद
4

रेल्वे रुळ ओलांडणे ठरतंय जीवघेणं; पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत ‘इतक्या’ अपघातांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.