Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपाच्या बड्या नेत्यांची मल्लिकार्जुन खर्गेंबरोबर गुप्त बैठक, तरीही कॉंग्रेसचे नेते गाफील’; प्रकाश आंबेडकरांचा बाळासाहेब थोरातांना सूचक इशारा

  • By युवराज भगत
Updated On: May 04, 2024 | 06:10 PM
जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

Follow Us
Close
Follow Us:

Ahmednagar South Lok Sabha Constituency : महाराष्ट्रात लोकसभेचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. आता नगरमधील प्रचार शिगेला पोहचलेला असताना, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नगरमध्ये सभा पार पडली.

प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

या सभेला संबोधित करीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप खेडकर हे उमेदवार आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्यासाठी धोक्यांची घंटा

आज दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची नगरमध्ये सभा पार पडली. या सभेला संबोधित करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी एक धोक्यांची घंटा असल्याचे सूचक विधानही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“अहमदनगरमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे २८ मे २०२३ रोजी रात्री ११:३० वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेऊन आले आहेत. त्यामुळे ही भेट बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. आता बाळासाहेब थोरात यांच्यासाठी दुसरी धोक्याची घंटा म्हणजे ९ जून २०२३ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मल्लिकार्जून खरगे हे सोलापूरवरून बंगळुरूला गेले होते.

काँग्रेसवाले गाफील

यावेळी ८ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मल्लिकार्जून खर्गे यांची गुप्त भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे मी आता सांगत नाही. मात्र, भाजपाची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहत आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी नगरच्या सभेत बोलताना केला.

बाळासाहेब थोरातांबाबत सूचक वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत बोलताना काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. तसेच बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी बाळासाहेब थोरात यांना सांगू इच्छित आहे की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तिकडे तुमचा स्वत:चा पक्ष वाचवा, नाहीतर तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष हा कधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही”, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

पुण्यात दुसरा मोठा गौप्यस्फोट करणार
नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचाराची सभा आज नगरमध्ये पार पडली. यावेळी या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटली यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. यानंतर याच सभेच बोलताना आपण आणखी एक गौप्यस्फोट करणार असून हा गौप्यस्फोट नगरमध्ये नाही तर पुण्यात करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Web Title: Senior bjp leaders secret meeting with mallikarjun kharge the explosion of prakash ambedkars secret caused excitement in politics nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीचे ठरले! समविचारींसोबत किंवा स्वबळावर लढणार निवडणूक
1

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीचे ठरले! समविचारींसोबत किंवा स्वबळावर लढणार निवडणूक

विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला ‘हा’ निर्णय
2

विधानसभा निवडणुकीसंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकाश आंबेडकरांनी घेतला ‘हा’ निर्णय

‘आमचा कामकाजाचा वेळ वाया…’; विधानसभेच्या ‘या’ प्रकरणात प्रकाश आंबेडकरांना हायकोर्टाचा दणका
3

‘आमचा कामकाजाचा वेळ वाया…’; विधानसभेच्या ‘या’ प्रकरणात प्रकाश आंबेडकरांना हायकोर्टाचा दणका

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र
4

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.