Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, Epstine Files मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ‘मुजरा’; वादग्रस्त विधानाने खळबळ

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. एपस्टाईन फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीेचे नाव असल्याचा दावा केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 01:36 PM
'आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात,

'आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची छी-थू होतेय'; प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात,

Follow Us
Follow Us:
  • प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
  • एपस्टाईन फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव असल्याचा दावा
  • यामुळे शेतकऱ्यांबाबत भाषा बदलली अशी टीका
Maharashtra Politics : मुंबई : मागील महिन्यापासून एपस्टाईन फाइल्सने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकच खळबळ उडवली आहे. अनेक लोकप्रिय नेते. बिझनेसमन आणि राजघराण्यातील प्रसिद्ध व्यक्तींची नावे या फाईल्समध्ये आढळली आहे. यामध्ये काही भारतीय व्यक्तींची नावे असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. एपस्टाईन फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मुजरा केला असल्याचा धक्कादायक आणि वादग्रस्त दावा केला आहे.

मुंबईत वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारविरोधात काढलेल्या मोर्च्याचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले की, “एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय शेतकऱ्यांविषयी असलेली भाषा बदलली. आतापर्यंत एपस्टिन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुजरा’ केलाय एवढीच माहिती बाहेर आली आहे. त्यात अजून काही माहिती आहे का? याचा खुलासा मोदींनी करावा. जगात ज्यांचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आले त्यावर त्या देशांनी कारवाई करून जेलमध्ये टाकले. भारतात कोणाच्याच विरोधात कारवाई नाहीये. आरएसएसचे मोहन भागवत यावर गप्प का?” असा धक्कादायक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना थेट इशारा दिला आहे की, “एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्याशी संबंधित दोन ‘रिल्स’ सार्वजनिक केले जातील. पंतप्रधान मोदी, एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर या रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील, तर मोदींनी सन्मानाने खुर्ची रिकामी करावी. भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भाजपने मोदींना पायउतार करावे,” असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हे देखील वाचा : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “चार महिन्यांपूर्वीची मोदींची भाषण बघा. आणि एपस्टिन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांबाबत भाषा बघा. आधी म्हणत होते की आम्ही भारतीय बाजारपेठ खुली करणार नाही. मात्र आता म्हणत आहे की भारताची बाजारपेठ ही जगासाठी खुली असणार आहे. देशातील ३५ टक्के जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली जगत असताना मोदींचे काही महिन्यांपूर्वीचे भाषण आणि प्रत्यक्ष करार यात मोठी तफावत आहे. अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू असल्याचा घणाघातही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

 

Web Title: Prakash ambedkar makes serious claim that pm narendra modi is named in epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Epstein Files
  • PM Narendra Modi
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

“ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न,” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, CJP आंदोलनावरून झाले आक्रमक
1

“ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न,” प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, CJP आंदोलनावरून झाले आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा
2

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.