Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या सुट्टीत चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग; अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

गेल्या शनिवारी (दि.१८) धनत्रयोदशीने दीपोत्सवास सुरूवात झाली. सोमवारी नरक चतुदशी मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी बलिप्रतिपदा, गुरुवारी भाऊबीज अशा सलग सरकारी सुट्टया होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 26, 2025 | 09:34 AM
दिवाळीचा फिव्हर कायम; चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग

दिवाळीचा फिव्हर कायम; चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ दिवसाच्या काळात शुक्रवार वगळता सलग लागून आलेल्या सुट्ट्यांची पर्वणी साधण्याची संधी मिळाल्याने कार्यालयांमध्ये कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. दिवाळीचा फिवर कायम असून थेट सोमवारीच कार्यालये गजबजणार आहेत.

गेल्या शनिवारी (दि.१८) धनत्रयोदशीने दीपोत्सवास सुरूवात झाली. सोमवारी नरक चतुदशी मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी बलिप्रतिपदा, गुरुवारी भाऊबीज अशा सलग सरकारी सुट्टया होत्या. शुक्रवारी (दि.२४) सुट्टी नसली तरी शनिवारी आणि रविवारी मात्र हक्काची साप्ताहिक सुट्टी होती. या सलग जोडून आलेल्या सुट्ट्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीच ठरल्या.

शुक्रवारची रजा टाकून संपूर्ण आठवडाभर सुट्टया घेण्याकडे बऱ्याच कर्मचाऱ्यांचा कल दिसून आला. दरम्यान, बहुतेक कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाऊन दिवाळी साजरी करत आनंद द्विगुणित केला. तर काहींनी कुटुंबासोबत पर्यटन केले. काही कर्मचाऱ्यांनी तिर्थस्थळांना भेटी देण्याचाही बेत आधीच आखून ठेवला होता.

सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांसाठी ठरल्या पर्वणी

सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीच ठरल्या असल्या तरी शुक्रवारी सर्वच सरकारी कार्यालय मात्र ओस पडल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते. बांधकाम, सामान्य प्रशासन यासारख्या विभागांमध्ये हे चित्र

बँकांचे कामकाज मात्र नियमितपणे सुरू

अन्य सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना बँक कर्मचारी मात्र इमानेइतबारे सेवा बजावित होते. एक-दोन दिवस बँकांना दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू होते.

ऑनलाईनमुळे एटीएमचा भार हलका

मोठ्या प्रमाणात मोबाईलवरून ऑनलाईन पध्दतीनेच आर्थिक व्यवहार केले जात आहे. त्यामुळे बँक तर सोडाच पण, एटीएमवरही जाण्याची गरज राहिलेली नाही. ऑनलाईन पध्दत सुरू होण्यापूर्वी सुट्टीच्या काळात पैसे काढण्यासाठी एटीएमच आधार असल्याने नागरिकांच्या लांबच रांगा लागलेल्या असायच्या.

या मशीनमध्ये असलेली रक्कम संपल्यानंतर नागरिकांना ऐन सणासुदीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. यावेळी मात्र सलग आठ दिवस सुट्टया असल्या तरी असे चित्र शहरात कुठेही दिसून आले नाही. ऑनलाईनमुळे एटीएमचा भार हलका झाल्याचे दिसून आले.

Web Title: Servants enjoy tourism during diwali holidays

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Nashik News
  • office work

संबंधित बातम्या

‘मोदींचा फोन आला तरी आता माघार घेणार नाही’; भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक नाराज…
1

‘मोदींचा फोन आला तरी आता माघार घेणार नाही’; भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक नाराज…

धक्कादायक ! TET च्या तणावातून शिक्षिकेची आत्महत्या; इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
2

धक्कादायक ! TET च्या तणावातून शिक्षिकेची आत्महत्या; इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
3

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
4

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.