शरद पवार यांना आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळल्यानंतर ते सिल्वर ओक म्हणजे त्यांच्या निवास्थानी रवाना झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना आज डिस्चार्च दिला गेला आहे. तसेच त्यांचा काही काळ रुग्णालयातील मुक्कम हा वाढला होता. अखेर आज आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.