Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय

Third Mumbai Land Acquisition News : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)' म्हणजेच अटल सेतू जवळ असलेल्या 'तिसरी मुंबई' मधील विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि वाटप धोरणाला मान्यता दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 06:54 PM
तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय

तिसऱ्या मुंबईसाठीच्या भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता, मुख्यमंत्र्‍यांचा महत्त्वाचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

Third Mumbai Land Acquisition News in Marathi : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)’ म्हणजेच अटल सेतू जवळ असलेल्या ‘तिसरी मुंबई‘ मधील विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि वाटप धोरणाला मान्यता दिली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या परिसराच्या विकासासाठी २०० चौरस किलोमीटर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडे सुपूर्द करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त “नवनगर विकास प्राधिकरण” तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन व भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील नियोजित शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, निवासी-वाणिज्यिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीस ठोस दिशा मिळणार आहे.

 ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६(१) अन्वये परस्पर संमतीने ठरलेल्या रकमेवर कराराद्वारे किंवा २०१३ च्या ‘भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम’नुसार भरपाई निश्चित करून भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच कलम १२६(१०) अन्वये रोख मोबदल्याऐवजी चटई निर्देशांक (एफएसआय) किंवा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) तसेच आवश्यकतेनुसार सुविधांसाठी/बांधकामांसाठी अतिरिक्त एफएसआय / टीडीआर स्वरूपात मोबदला देऊन भूसंपादन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या धोरणांतर्गत २२.५ टक्के जमीन परतावा धोरण लागू करण्यात येणार आहे. खासगी मालकीची जमीन वाटाघाटीद्वारे संपादन करताना नगर विकास विभागाच्या १ मार्च २०१४ व २८ मे २०१४ रोजीच्या शासन निर्णयांनुसार प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्याचे धोरण लागू करण्यात येणार आहे. २२.५ टक्के परतावा योजनेअंतर्गत देय भूखंडाचे क्षेत्र ४० चौ. मीटरपेक्षा कमी असल्यास रोख मोबदला देण्यात येणार आहे.

अविकसित भागांमध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी ‘पास-थ्रू पॉलिसी’ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या धोरणानुसार भूसंपादन मोबदल्याची किंमत, पायाभूत सुविधा विकसित करण्याचा खर्च हप्त्यांमध्ये भूखंडधारकाकडून वसूल करण्यात येईल. भूसंपादनाचा पूर्ण खर्च, नोंदणी शुल्क व अस्थापना शुल्क भूखंडधारकाकडून वसूल करण्यात येईल. एमएमआरडीएकडून १५ टक्के अस्थापना खर्च आकारण्यात येईल. संबंधित क्षेत्रात पायाभूत सुविधा एमएमआरडीए पुरविणार नाहीत. पात्र प्रकल्प घटकास जमीन “जशी आहे तशी” तत्वावर देण्यात येईल. भविष्यात वाढीव मोबदला लागल्यास ती रक्कम भूखंडधारकाकडून वसूल केली जाईल. या अटींनुसार एमएमआरडीए व भूखंडधारक यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.

परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीच्या धोरणानुसार अटल सेतू प्रभाव क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आणणाऱ्या उद्योगांना प्राधान्याने भूखंड वाटप करण्यात येणार आहे. किमान १०० एकर जमीन घेणे बंधनकारक असून जमिनीच्या किमतीव्यतिरिक्त प्रति १०० एकर किमान २५० कोटी रुपये गुंतवणूक चार वर्षांत करणे अनिवार्य राहील. अविकसित जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही. एकूण विकसित क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत क्षेत्र एफडीआय साठी अनुज्ञेय राहील. पात्रता व निकष एमएमआरडीएने निश्चित केलेल्या अटी-शर्तींनुसार राहतील.

जमीन विकसित करण्यासाठी, तसेच भागीदारी तत्त्वावर विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) स्थापन करून विकास केंद्र उभारण्यासाठी जमीन संकलकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतील. या धोरणानुसार सविस्तर भूवाटप नियमावली तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांतून शासन व एमएमआरडीए ला जास्तीत जास्त महसूल प्राप्त होईल असा सक्षम रेव्हेन्यू मॉडेल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासास गती मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील औद्योगिक व शहरी विस्तारासाठी नवे विकास केंद्र उदयास येणार आहे.

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

Web Title: Approval for the land acquisition and land allotment policy for the third mumbai an important decision by the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • cabinet decisions
  • devendra fadnavis
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ
1

Narhari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट; वादग्रस्त ‘चित्रफीत’ प्रकरणाने राष्ट्रवादीत खळबळ

एकत्र सत्तेत, पण मतभेद कायम! भाजप–शिंदेसेनेतील संघर्ष चिघळला, महायुतीत मिठाचा खडा
2

एकत्र सत्तेत, पण मतभेद कायम! भाजप–शिंदेसेनेतील संघर्ष चिघळला, महायुतीत मिठाचा खडा

Ashok Kharat : “फडणवीसांना CM पदावरुन काढून टाकण्यासाठी अघोरी पूजा? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा
3

Ashok Kharat : “फडणवीसांना CM पदावरुन काढून टाकण्यासाठी अघोरी पूजा? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा

अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !
4

अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.