शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर! महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपूरात, काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लागले लक्ष
महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपुरात होत असून या निमित्तान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. बैठकीला माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना तसेच शेकाप पक्ष, मित्र पक्षांसोबत जिल्ह्यातील अनेक नेते यांच्या उपस्थितीत श्रीयश पॅलेस, पंढरपूर येथे दि. २३ रोजी १२ वा. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील पहिली बैठक संपन्न होणार आहे.
पंढरपूर : महाविकास आघाडीची पहिली बैठक पंढरपुरात होत असून या निमित्तान राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. बैठकीला माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना तसेच शेकाप पक्ष, मित्र पक्षांसोबत जिल्ह्यातील अनेक नेते यांच्या उपस्थितीत श्रीयश पॅलेस, पंढरपूर येथे दि. २३ रोजी १२ वा. महाविकास आघाडीची महाराष्ट्रातील पहिली बैठक संपन्न होणार आहे.
सदर दौऱ्यात सकाळी १०:०० वाजता कापसेवाडी (ता. माढा) येथे द्राक्ष बागायतदार मेळाव्यास शरद पवार मार्गदर्शन करतील. यानतंर दुपारी १२ वाजता पंढरपूर श्रीयश पॅलेस माहविकास आघाडी बैठक होईल. १ः३० वाजता पंढरपूरचे नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर यांच्या घरी भोजन करतील. दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर मंदिरात पांडुरंगाचे दर्शन, २ः३० वाजता ट्युलिप हॉस्पिटल लोकार्पण व ३ः३० वाजता हेलिकॉप्टरने परत पुण्याला रवाना असे कार्यक्रमांचे नियोजन अाहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते, श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार व नेत्यांनी पक्ष सोडला. त्या काळात सोलापूर, पंढरपूर जिल्ह्यातून अभिजीत पाटील यांनी शदर पवार साहेबांना भक्कम पाठिंबा दर्शविला आहे. अभिजीत पाटील यांच्या नियोजनाखाली ही बैठक संपन्न होणार आहे. सोलापूर तसेच पंढरपूर, मंगळवेढा कार्यकर्त्यांना शरद पवार काय मंत्र देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दि. २१ ते २६ दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरा संपन्न होणार आहे. त्यात दि. २३ रोजी होणारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची पहिली बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
Web Title: Sharad pawar to visit pandharpur maharashtra maha vikas aghadis first meeting in pandharpur all eyes are on what mantra will be given nrab