Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार आयोगासमोर राहणार गैरहजर, अनुपस्थितीबाबतचा अर्ज मान्य

भीमा कोरेगाव प्रकरणी (Bhima Koregaon Case) उसळलेल्या हिंसाचाराला आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथले वातावरण बिघडवले होते. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा (Pune Police) तपास यात कमालीचा विरोधाभास आहे. असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही (Witness Inquiry) चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.

  • By साधना
Updated On: Feb 22, 2022 | 07:35 PM
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार आयोगासमोर राहणार गैरहजर, अनुपस्थितीबाबतचा अर्ज मान्य
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणाची (Bhima Koregaon Case) चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Rashtrawadi Congress) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हजेरी लावण्याची शक्यता कमी आहे. तसा अर्ज त्यांच्यावतीने आयोगाकडे दाखल करण्यात आला असून आयोगानेही त्यांचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाकडून जारी केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते.

[read_also content=”घराशेजारी सुरु होता दारू अड्डा; तक्रार करून ही दखल न घेतल्याने संतापलेल्या महिलांनी हातात हातोडा घेतला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/solapur/the-liquor-store-starts-next-door-the-enraged-women-took-a-hammer-in-their-hands-nrvk-243495.html”]

पुण्यातील (Pune) कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे (NIA) सोपवला असला तरी चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला आधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथले वातावरण बिघडवले होते. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे. असे पवार यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.

या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले होते. त्याची दखल घेत आयोगाने शरद पवार यांना २३ आणि २४ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे बोलावणे पाठवले होते. मात्र, पवारांकडून अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेल देण्याची विनंती करणारा अर्ज आयोगाकडे करण्यात आला तो न्या. जे. एन. पटेल यांनी स्विकारला. त्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या आयोगाच्या सुनावणीदरम्यान पवारांची साक्ष होणार नाही.

Web Title: Sharad pawar wont be present on 23rd and 24th february for inquiry commision witness process of bhima koregaon case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 07:34 PM

Topics:  

  • Mumbai
  • Witness

संबंधित बातम्या

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
1

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक
2

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट
3

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा
4

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.