Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

CNG Price Hike: महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि लगतच्या परिसरातील सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचा नवा दर ९१.५० रुपये प्रति किलो होणार. पश्चिम आशियातील तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसचे वाढलेले दर आणि देशांतर्गत गॅस वाटपातील कपात यामुळे खरेदी खर्च वाढले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 06:36 PM
सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत मध्यरात्रीपासून CNG महागणार
  • रिक्षा-टॅक्सी चालकांसह खासगी वाहनधारकांना फटका
  • CNG दरात १.५० रुपयांची वाढ
  • आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार
CNG Price Hike: राज्यात महागाईचा दबाव कायम असतानाच आता मुंबईकरांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मुंबई आणि लगतच्या परिसरातील सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजीचा दर आता ९१.५० रुपये प्रति किलो झाला आहे. हे सुधारित दर १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांसह खासगी सीएनजी वाहनधारकांवर होण्याची शक्यता आहे.(CNG Price Hike)

पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस महागला

महानगर गॅस लिमिटेडने या दरवाढीमागील कारणे स्पष्ट केली आहेत. पश्चिम आशियातील सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत गॅस वाटपात कपात झाल्याने कंपनीला महागड्या आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसवर (RLNG) अधिक अवलंबून राहावे लागत आहे.

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक

एकूण गॅस पुरवठ्यात आयात केलेल्या गॅसचा वाटा वाढल्याने कंपनीच्या खरेदी खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या वाढलेल्या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड गॅस पुरवठा सुरू ठेवण्यासाठी दरवाढ करणे आवश्यक ठरल्याचे MGL ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

पुणे, नाशिक आणि धुळ्यातही दरवाढ

मुंबईपूर्वी राज्यातील पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतही सीएनजी आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) दरात वाढ करण्यात आली आहे. या शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो १.२५ रुपयांची, तर पीएनजीच्या दरात प्रति घनमीटर १.५० रुपयांची वाढ झाली आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या खर्चात वाढ

मुंबईतील सीएनजी दरवाढीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर धावतात. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाल्याने चालकांचा दैनंदिन खर्च वाढणार आहे. खासगी सीएनजी वाहनधारकांनाही आता प्रत्येक किलो गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागतील. इंधन खर्च वाढल्याने रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची मागणी पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, या दरवाढीनंतर प्रत्यक्ष भाडेवाढ होणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त भार

जीवनावश्यक वस्तू, घरगुती खर्च आणि वाहतुकीच्या खर्चात वाढ होत असताना सीएनजीच्या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या बजेटवर आणखी परिणाम होऊ शकतो. विशेषतः दररोज वाहनांचा वापर करणारे नोकरदार, व्यावसायिक आणि वाहतूकदार यांना या वाढीचा आर्थिक फटका बसणार आहे.

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती आणि देशांतर्गत पुरवठ्यातील बदल यांचा परिणाम इंधन दरांवर होत आहे. तर दुसरीकडे या वाढीचा भार थेट ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजी दर आणि वाहतूक भाड्याबाबत काय बदल होतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत सीएनजीचा नवा दर किती झाला आहे?

    Ans: मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीचा दर प्रति किलो १.५० रुपयांनी वाढून ९१.५० रुपये झाला आहे.

  • Que: मुंबईतील सीएनजी दरवाढ कधीपासून लागू होणार आहे?

    Ans: महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केलेले सुधारित दर १४ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

  • Que: सीएनजी दरवाढीमागे काय कारण आहे?

    Ans: पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर वाढले आहेत. तसेच देशांतर्गत गॅस वाटपात कपात झाल्याने आयात केलेल्या RLNG गॅसवरील अवलंबित्व आणि कंपनीचा खरेदी खर्च वाढल्याचे MGL ने म्हटले आहे.

Web Title: Mumbai cng price hike mgl new rate 91 50 november 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • CNG
  • Mumbai

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad CNG Price Hike:  सीएनजी शंभरीच्या उंबरठ्यावर! पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची कात्री
1

Pimpri Chinchwad CNG Price Hike: सीएनजी शंभरीच्या उंबरठ्यावर! पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची कात्री

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?
2

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
3

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर
4

Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.