Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात; मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालकाने भरधाव गाडी…

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा अपघात झाला. रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३०-१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला.

  • By प्रीति माने
Updated On: May 18, 2025 | 12:16 PM
shetkari leader Ravikant Tupkar car accident at Pargaon toll plaza in Vashi taluka

shetkari leader Ravikant Tupkar car accident at Pargaon toll plaza in Vashi taluka

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा अपघात झाला. रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३०-१ वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हरने भरधाव ट्रकची इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही. गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांनी दिलेली ‘लोकरथ’ नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने (MH 44 U 1444) गाडीला जोरदार धडक दिली. ट्रक चालक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले. या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र, गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. तर चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही. ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती चे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील किनर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखरेने भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. हा अपघात होता की, घातपाताचा प्रयत्न, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या ते दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशी जवळ हा अपघात घडला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजुनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे (पंढरपूर )याचेवर वाशी पोलीस स्टेशन ला कलम 281,कलम 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी 5 वाजेपर्यंत चालू होती.

Web Title: Shetkari leader ravikant tupkar car accident at pargaon toll plaza in vashi taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Car Accident
  • Ravikant Tupkar
  • Road Accident

संबंधित बातम्या

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
1

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त
2

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, ‘ती’ कार आली अन्…
3

तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, ‘ती’ कार आली अन्…

Pune News : पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण; भरधाव कारने माय-लेकाला उडवले
4

Pune News : पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण; भरधाव कारने माय-लेकाला उडवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.