सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसीमध्ये टॉवेल कारखान्याला आग लागली आहे (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग लागली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमध्ये केवळ सहा महिन्यांचे चिमुकले मूल अडकल्याची भीती आहे. तर घटनास्थळाहून गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना वाचवण्यात आले. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरामध्ये लागलेल्या या आगीमध्ये आणखी 5 ते 6 जण अजूनही अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून अजूनही बचावकार्य सुरू आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, आगीत तीन जण अडकले आणि त्यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीत अजूनही काही लोक अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारखाना मालक आणि त्याचे कुटुंब इमारतीत अडकले आहेत. कारखान्यात अडकलेल्यांमध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक ७८ वर्षीय उस्मानभाई मन्सूरी, २३ वर्षीय शिफा मन्सूरी, २४ वर्षीय अनस मन्सूरी आणि ६ महिन्यांचा मुलगा युसूफ मन्सूरी यांचा समावेश होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्याचा आरोप
आगीतून बचावलेल्या नातेवाईकांनी अग्निशमन विभागाला दोष दिला आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या वेळेवर पोहोचल्या नाहीत, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अग्निशमन विभागाकडे आग विझविण्यासाठी आधुनिक उपकरणे आणि साहित्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता मोठी असून यामध्ये त्यांच्या कुटुंबियांची वाचण्याची शक्यता कितपत आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली. या कारखान्यात टॉवेल तयार करण्याचे काम केले जायचे. टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग वेगाने पसरत गेली. यामुळे आगीने मोठे स्वरुप धारण केले. आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या त्याशिवाय अक्कलकोट पंढरपूर चिंचवड एमआयडीसी एनटीपीसी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले आहेत. कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आतमध्ये जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. साईड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी पहाटे साधारण तीनच्या सुमारास टॉवेल कारखान्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिसरातील काही लोकांनी 108 या क्रमांकावर फोन करत दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या.