मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. यानंतर मांगुर हुपरी मार्ग, संकेश्वर हिटणी, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government) निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला आहे.
[read_also content=”महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री, त्यामुळे ते कोणतीच भूमिका घेत नाहीत – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/the-chief-minister-of-maharashtra-is-not-of-shivsena-he-is-the-cm-of-bjp-so-he-is-not-taking-any-role-jayant-patil-352174.html”]
दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government) सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर टिका होत आहे. दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देखील सीमाप्रश्नी पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मंगळवारी बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लगेच पत्रकार परिषद घेत, बेळगावमध्ये ४८ तासात हल्ले थांबले नाहीतर, मला कर्नाटकमध्ये जावे लागेल असं म्हणत शरद पवारांनी कर्नाटक व महाराष्ट्र सरकारला अल्टीमेटम दिला होता. यावर शरद पवारांना कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही, अंस गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यानंतर आज शरद पवारांच्या अल्टिमेटवर शिंदे गटाने टिका केली आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी ट्विट करत शरद पवारांना टोला लगावला आहे. “ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना? गेले आहेत? की फक्त “कर नाटक”?” अशा प्रकारेच ट्विट शितल म्हात्रे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी टिका करताना म्हटलंय की, जे मोठमोठ्या आवेशात हल्ले थांबले नाहीतर, आपण ४८ तासात कर्नाटकात जाऊ, तसेच आमचा देखील संयम सुटेल, असा इशारा दिला होता, ते खरोखरंच कर्नाटकात गेले आहेत का? असा सवाल शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विट करत विचारला आहे.