फोटो सौजन्य - Social Media
शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पेण खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी हॉटेलच्या हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे पेण सुधागड विधासभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे, उबाठा शिवसेनेचे प्रभाग संघटक लहूशेठ पाटील तसेच लिलाधर पाटील,वनिता पाटील,मनसे शहर सचिव वैशाली शिंदे यांचे स्वागत जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते आढावा बैठकी प्रसंगी करण्यात आले.
यावेळी उप जिल्हाप्रमुख उद्धव कुथे, संपर्क प्रमुख यशवंत मोकल, उप तालुका प्रमुख सुरेश कोळी, सचिन बोर्डे, युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे, विभाग प्रमुख प्रमोद घरत, नरेश शिंदे ,चंद्रकांत पाटील,सपना राऊत,रेखा तांडेल,वंदना, मानसी ढवळे,पाशिलकर महिला वर्ग,कार्यकर्त्ये उपस्थित होते.
पेण मध्ये पहिले ही पहिल्या क्रमांकावर शिवसेना होती आणि आताही पहिल्या क्रमांकावर शिवसेनाच आहे, तुम्ही फक्त जनतेला आपल्या संघटनेचे काम दाखवा म्हणजे संघटना आपोआप वाढेल सर्वांनी एकत्र येऊन काम करा शिवसेना सदस्य नोंदणी करून नियुक्त करून नव्याने नेमणूका करा. येणाऱ्या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार सीट घेण्यात येतील असे मार्गदर्शन जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आढावा बैठकी प्रसंगी केले. यावेळी तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी आपली खंत मांडताना,”आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळून महायुतीच्या उमेदवाराचे निष्ठेने काम केले पण आता ते बोलत असतील तर शिवसेनेची ताकद कमी आहे.”
तर येणाऱ्या पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार असल्याचा इशारा तालुका प्रमुख मानकवळे यांनी दिला. तर यावेळी प्रवेशकर्ते यांनी आम्ही आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिंदे गट शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला असल्याचे सांगितले. आपल्या तालुक्याचा विकास साधण्यासाठी राजकीय ताकद लागते आणि शिवसेना सरकारमध्ये असल्याने नक्कीच विकास साधला जाईल याचा विश्वास आम्हला असल्याचे प्रमोद मोरे व लहूशेठ पाटील यांनी सांगितले.