Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant : ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

मंत्री उदय सामंत यांनी दावोसमधून ठाकरे गटाचे अनेक आजी माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याबाबत आज पत्रकार परिषदेत सर्व काही माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 23, 2025 | 05:44 PM
ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Follow Us
Close
Follow Us:

मंत्री उदय सामंत यांनी दावोसमधून ठाकरे गटाचे अनेक आजी माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्याबाबत आज पत्रकार परिषदेत सर्व काही माहिती देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यातील काही कोकणातील असून आणखी काहींनी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या…”; जयंतीनिमित्त शिवसेनेची मोदी सरकारकडे मोठी मागणी

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून, आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत, ते तिथे बसून एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आता उदय सामंत यांनी यावरुन संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांना नियती धडा शिकवले. त्यांनी राजकारणासाठी माझा बळी देण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात उदय सामंत यांनी टीका केली आहे.

“सलग तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे साहेबांमुळे मी उद्यागमंत्री झालो. मला दाओसला जाता आलं. गेल्या दोन वर्षात आम्ही सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे MOu करण्यात यशस्वी झालो. आज तीच प्रथा आम्ही कायम ठेवली. सुमारे १५ लाख ७० हजार कोटींचे MOU आम्ही महाराष्ट्रासाठी केले आहेत. मी उद्योगमंत्री म्हणून समाधानी आहे. काही लोकांनी विचारलं की मागच्या वर्षीच्या mou चं काय झालं? मी नसताना काय काय ते बोलले आहेत. त्यांची निष्ठा किती आहे हे महाराष्ट्राला ४ वाजताच पत्रकार परिषदेत सांगतो”, असे उदय सामंत म्हणाले.

“शाळेत आपण जसे भांडायचो, तसे काही राजकीय नेते झाले आहेत. त्यावर मी संध्याकाळी सविस्तर बोलणार आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत चांगली भूमिका जे कोणी मांडतील, त्यांचं समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत, हे माझं मोठेपण आहे. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. मी दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यांच्या बाबत मी एवढेच सांगू इच्छितो की ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना कॉल करत आहेत. काल सुद्धा त्यांचा कॉल आला होता आणि आमचा आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असेदेखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं”, असा दावाही उदय सामंत यांनी केला.

Ladki Bahin Yojana : बांगलादेशी महिला सुद्धा झाल्या सरकारच्या लाडक्या बहिणी; योजनेचा घेतला थेट लाभ

“उद्यापासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला रत्नागिरीतून सुरुवात होत आहे. संजय राऊतांनी जे काही आरोप केलेत, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात उद्या रत्नागिरीतून प्रत्युत्तर देऊन करणार आहे. उबाठाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल. संजय राऊत यांना नियती धडा शिकवेल. त्यांनी राजकारणासाठी माझा बळी देण्याचा प्रयत्न केला”, असेही उदय सामंत म्हणाले.

Web Title: Shiv sena uddhav thackeray group 10 ex mlas will be join eknath shinde shiv sena uday samant claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • ubt shiv sena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

“स्वतःला अभिनेत्री समजता का? तुम्हीसुद्धा अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा,” सुशांत शेलार यांची सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड
1

“स्वतःला अभिनेत्री समजता का? तुम्हीसुद्धा अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा,” सुशांत शेलार यांची सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड

उदय सामंत यांची पत्नी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या रिंगणात, राजकीय नेत्यांचे गंभीर आरोप
2

उदय सामंत यांची पत्नी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या रिंगणात, राजकीय नेत्यांचे गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना म्हणजेच शिंदे गटच ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला
3

Chhatrapati Sambhajinagar: शिवसेना म्हणजेच शिंदे गटच ! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेत्यांना सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.