मुंबई: बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झालेला आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारातील काही रक्कम जमा झाली होती. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात संपूर्ण पगार जमा झाला आहे. मात्र याच विषयावरुन आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. त्याला आता शिवसेनेच्या नेत्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
काही दिवसांपूर्वी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नव्हता. आम्ही त्यांच्यासाठी भांडलो, तेव्हा त्यांचा पगार जमा झाला. आता तीच परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांवर आली आहे. फक्त ५६ टक्के पगार त्यांना दिला जात आहे. यांना सत्तेत येऊन ६ महिनेही झाले नाही तर यांची ही स्थिती आहे. उद्या ही वेळ कोणत्याही कर्मचाऱ्यावर येऊ शकते.
डॉ. मनिषा कायंदे काय म्हणाल्या?
आदित्य ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मी आदित्य ठाकरे यांना आठवण करुन देऊ इच्छिते की, तुमच्या सरकारमध्ये म्हणजे तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना तब्बल 172 दिवसांचा एसटीचा संप झाला होता. 90 हजार कर्मचारी त्या संपामध्ये सहभागी झाले होते आणि तेव्हा तुम्ही काय करत होतात..
तुम्ही एकदा तरी त्या आझाद मैदानावर गेलात का? त्यांना भेटलात का?
त्यांचा संप मिटवण्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वडिलांनी माननीय उद्धव ठाकरेजी यांनी काय प्रयत्न केले? तर कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर जवळजवळ दोन हजार कर्मचारी बडतर्फ झाले. त्यांच्या घरातली चूल विझली, तरी तुम्ही काय केलं नाही. त्यानंतर अकरा हजार कर्मचारी निलंबित झाले परंतु त्यांनी तुम्हाला कोणताच फरक पडला नाही आणि हे सगळं असताना म्हणजे आपण स्वतः मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही.
Big Breaking: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात जमा झाला संपूर्ण पगार
आझाद मैदानला जाणं तर सोडाच हे सगळं तुमच्या काळात घडलं. आम्ही एसटीच्या नवीन बसेस घेतोय कर्मचाऱ्यांच्या पगारात वेळेवर होतील, याची आम्ही काळजी घेतोय. त्यांना एसटी डेपोमध्ये सोयी सुविधा चांगल्या दिल्या जातील, यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
निदान तुमच्या काळात काय झालं होतं ते जरा आठवून बघा आणि नंतर आमच्यावर टीका करण्याचे धाडस करा…
एसटी कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार जमा
बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झालेला आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारातील काही रक्कम जमा झाली होती. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात संपूर्ण पगार जमा झाला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ५६ टक्के पगार जमा झाला होता. आज सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे उर्वरित वेतन (४४%) त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे.