Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही…”; शिवसेनेतील नाराजीवर भास्कर जाधव यांनी दिले स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तर यानंतर भास्कर जाधव यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2025 | 04:36 PM
Bhaskar Jadhav on shivsena upset

Bhaskar Jadhav on shivsena upset

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महायुतीचा एकतर्फी विजय झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. अनेक नेत्यांनी साथ सोडून सत्ताधारी पक्षामध्ये हातमिळवणी केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तर यानंतर भास्कर जाधव यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली.

कोकणामध्ये ठाकरे गटाची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील एकच आमदार असलेले भास्कर जाधव हे देखील महायुतीमध्ये नाराज आहेत. ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्यामुळे ठाकरे गटाला गळती लागल्याची दिसत आहे. मला मा‍झ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं होतं, यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव?

भास्कर जाधव यांच्या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये ते नाराज असल्याचे चित्र होते. शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत असल्याचे देखील वक्तव्य केले होते. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, मा‍झ्या क्षमतेप्रमाणे गेल्या ४३ वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. त्या पुढं जाऊन मी असं म्हणालो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही, असं अनेकांच्या बाबतीत घडतं, म्हणून हे माझं दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ही राजकीय स्टंटबाजी केली जात असल्याची टीका देखील भास्कर जाधव यांच्यावर करण्यात आली. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, “गेल्या 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबानं. नाही मिळालं तर…. म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता म्हणून हे सगळं करतोय, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय.. मी कोणाकडे तरी जाणार याासाठी वातावरण तयार करतोय… मा‍झ्या आयुष्यात असली नौटंकी कधी केली नाही. माझ्या आयुष्यातील किती राजकीय वर्ष राहिली? जे मी त्या काळात केलं नाही, आता कशाला करेल? हे मी पद मिळवण्याकरिता करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे,” असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भास्कर जाधव पुढे म्हणाले की, जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन. काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारची स्टंटबाजी केली आणि गणनेते पद पदरात पाडून घेतलं…. अरे ज्या माणसाने ४३ वर्षे अनेक पदे उपभोगली… पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा कुठल्यातरी पदाकरिता मी करणं आणि माझ्या तत्व प्रणालीला गालबोट लावणं मी कधीही केलं नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन,” असेही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले की, “माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत. राजकारणात ते दोष असावेत की नाही यावर चर्चा होऊ शकते. मी खोटं बोलत नाही, मला समोरचा माणूस खोटं बोलला की प्रचंड चीड येते. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द मी प्राण गेला तरी खाली पडू देत नाही. कोणाला खूष करण्यासाठी मी बोलत नाही. खरं काय ते बोलण्याचं धाडस माझ्यात आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.

“४३ वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकि‍र्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगलं काहीतरी घडावं यासाठी माझी तळमळ आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.

Web Title: Shivsena mp bhaskar jadhav gives explantion on shivsena upset

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • shivsena
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
3

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
4

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.