Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…

प्रस्थान सोहळा दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाडयातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, त्याला उजाळा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 08:53 PM
पाऊले चालती पंढरीची वाट! जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान…
Follow Us
Close
Follow Us:

देहूगांव: पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थव्रत… या ओवीप्रमाणे वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली असून, आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (ता. १८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या निमित्ताने देऊळ वाडयाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल झाले असून, देहूनगरीत भक्तीचा महापूर ओसंडला आहे.

या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ  चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज, गणेश महाराज मोरे  सांगितले. ते म्हणाले, यंदाचा पालखी सोहळा ३४० वा आहे. प्रस्थान सोहळा दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाडयातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, त्याला उजाळा देण्यात आला आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या ५०० दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोडी स्वतः खरेदी केल्या आहेत.

असा असेल प्रस्थान सोहळा

पहाटे ५ वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात  देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे ,पालखी सोहळा प्रमुख हभप दिलीप महाराज मोरे ,वैभव महाराज मोरे ,गणेश महाराज मोरे ,विश्वस्त उमेश महाराज मोरे ,विक्रमसिंह महाराज मोरे  मोरे ,आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती होणार आहे.

पहाटे ५ :३० वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे ,विश्वस्त उमेश महाराज मोरे ,विक्रमसिंह महाराज मोरे व लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा  व आरती करण्यात येणार आहे.*

सकाळी ९ ते ११ श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदार साहेब वाड्यात करण्यात येणार आहे त्यानंतर परंपरेनुसार संस्थानच्या वतीने या पादुका डोईवर घेऊन मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या जातील.

सकाळी १० ते १२ पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान  सोहळा सप्ताहाची संगता होईल.

दुपारी २:३० वाजता ,प्रमुख मान्यवर व महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांना महाभिषक घालून महापूजा करण्यात आल्या नंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होईल.प्रमुख दिंड्याच्या उपस्थित आणि वारकरी भाविक भक्तांच्यासह हरिनामाच्या गजर करत टाळ मृदंगाच्या निनादात ,गरुड , टक्के यांचा समवेत सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातुन प्रस्थान होईल ,आणि सायंकाळी ६ : ३० वाजता जगसगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदार साहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन  रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन , हरिणाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.

Web Title: Shri sant tukaram maharaj palkhi go to pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 08:53 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • pandharpur
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
1

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास
2

ओढ्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन
3

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर
4

Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.