CM Devendra Fadnavis' reaction to Yogesh Kadam's statement on Pune crime case
St Mahamandal : एसटीच्या ताफ्यात प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत गाड्या कमी पडत असल्याने भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासन हतबल ठरले असून नव्या गाड्या तात्काळ येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून त्यात भाडेवाढीसह नवीन गाड्या ताफ्यात दाखल होण्यासाठी होणाऱ्या विलंबा बाबतीत सविस्तर माहिती विषद करण्यात आली आहे.
एसटीने १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली असली तरी गेल्या दहा दिवसांचे सरासरी उत्पन्न पाहिल्यास त्यातून फक्त साधारण ७.५ टक्के इतकेच उत्पन्न मिळाले आहे.भाडेवाढी पूर्वीचे उत्पन्न दिवसाला सरासरी २८ कोटी रुपये असून भाडेवाढीनंतर दिवसाला सरासरी ३२ कोटी ७४ लाख रुपये इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना फक्त ३० कोटी २२ लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळत असून साधारण २ कोटी ५१ लाख रुपये इतकी रक्कम दिवसाला अपेक्षित उत्पन्नपेक्षा कमी मिळत आहे. याचाच अर्थ भाडेवाढ करूनही गाड्या कमी पडत असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही.त्या मुळे नवीन गाड्या ताफ्यात तात्काळ येण्याची गरज असून फेब्रुवारी २४ पासून नव्याने येणाऱ्या ५१५० भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस पैकी आता पर्यंत फक्त २२० बस आल्या असून कबूल करून सुद्धा महिन्याला २०० पेक्षा जास्त गाड्या दिलेल्या नाहीत.फेब्रुवारी पासून आता पर्यंत पुरवठादार कंपनीने साधारण २५०० गाड्या कमी दिल्या आहेत.
या शिवाय सद्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बस मधून प्रती किलो मिटर १५ ते २०रुपये इतके नुकसान होत आहे त्या मुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला पाहिजे.व झालेली नुकसान भरपाई तसेच दंड कंपनीकडून वसूल करण्यात आला पाहिजे. गाड्या लवकर येण्यात एसटी प्रशासन हतबल झालेले दिसत असून ते पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्यात कुचराई करीत आहे.त्या मुळे यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष दिले व हस्तक्षेप केला तरच गाड्या लवकर येतील.असेही निवेदनात बरगे यांनी म्हटले आहे.
या शिवाय नोव्हेंबर नंतर येणाऱ्या नवीन स्व मालकीच्या २६४० गाड्यांपैकी आता पर्यंत फक्त ११० गाड्या पुरवठादार कंपनीने दिल्या असून तिथेही साधारण अपेक्षित ३०० गाड्या वेळेवर आलेल्या नाहीत. या दोन्ही प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गाड्या ताफ्यात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच उपयोग होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.त्याच प्रमाणे भाडेवाढ करतांना एकच्या पटीत करण्यात आल्याने प्रवाशी व वाहक यांच्यात सुट्या पैशावरून दररोज तंटे निर्माण होत असून त्याचाही फटका उत्पन्न वाढीला बसत असून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल करण्यात येऊन भाडेवाढ पाचच्या पटीत केली पाहिजे असेही बरगे यांनी निवेदनात म्हटले आहे.