Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

महाराष्ट्रात किती टायर पायरोलिसिस कारखाने आहेत, याची माहिती खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही. 'नवराष्ट्र'ने केलेल्या तपासात राज्यातील १०३ कारखान्यांचे वास्तव आणि वाढत्या प्रदूषणाचे गंभीर धोके समोर आले आहेत

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 03:11 PM
धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही (Photo Credit- X)

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने?
  • खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही
  • ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा
Tire Pyrolysis Plants Maharashtra: देशभरात टाकाऊ टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, महाराष्ट्रात अशा कारखान्यांची नेमकी संख्या किती, याची अचूक व अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण विभागाकडे राज्यातील सर्व कारखान्यांची एकसंध, अद्ययावत आणि सार्वजनिक माहिती नसल्याची बाब नवराष्ट्रच्या तपासातून प्रकाशझोतात आली आहे.

देशाच्या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत कागदपत्रांनुसार, देशात एकूण ७३६ टायर पायरोलिसिस कारखाने अस्तित्वात आहेत. यापैकी केवळ सुमारे ४६ टक्के कारखाने पर्यावरणविषयक नियमांचे पालन करतात, तर उर्वरित कारखाने नियमबाह्य किंवा अपूर्ण पालन करत असल्याचे नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे, या केंद्रीय संस्थेकडेही महाराष्ट्रातील कारखान्यांची अद्ययावत व खात्रीशीर स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही.

नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय अहवालामध्ये विखुरलेल्या नोंदींमधून महाराष्ट्रात सुमारे १०३ टायर पायरोलिसिस कारखाने असल्याचा उल्लेख आढळतो, मात्र ही संख्या कोणत्या वर्षाची आहे, त्यातील किती कारखाने सध्या कार्यरत आहेत आणि किती बंद, याबाबत स्पष्टता नाही. हीच बाब राज्याच्या पर्यावरणीय नियंत्रण व्यवस्थेची मोठी मर्यादा ठरत आहे.

Talath News: तलाठ्यांचे काम झाले सुकर! राज्यातील सर्व फेरफार नोटिसा आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय

नवराष्ट्रने केलेल्या क्षेत्रीय पाहणी आणि उपलब्ध कागदपत्रांच्या अभ्यासातून महाराष्ट्रात शंभराहून अधिक टायर जाळणारे कारखाने अस्तित्वात असल्याचे आढळून आले. अनेक कारखाने ग्रामीण व अर्धशहरी भागांत कार्यरत असून, धूर, दुर्गंधी व राखीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

देशात ७३६ टायर पायरोलिसिस कारखाने

देशात ७३६ टायर पायरोलिसिस कारखाने आणि त्यातील निम्म्याहून कमी कारखान्यांकडून नियमांचे पालन, ही पाश्र्वभूमी असताना, महाराष्ट्रातील अचूक माहितीच उपलब्ध नसणे हीच सर्वात धोकादायक बाब ठरते. नवराष्ट्रने उघड केलेल्या या वास्तवामुळे, राज्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा आणि मंत्रालयीन पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्यात परिस्थिती गंभीर

राज्यात किती कारखाने परवानाधारक आहेत, किती बेकायदेशीर आहेत आणि किती नियमांचे उल्लंघन करतात, याची अधिकृत व सार्वजनिक माहिती उपलब्ध नसल्याने नियंत्रण यंत्रणा कमकुवत ठरत आहे. देशात जिथे शेकडो कारखाने असून निम्म्याहून अधिक नियमांचे पालन करत नसतील, तिथे महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यात परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.

मनपाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी; प्रत्येक वॉर्डाला ५० कोटींचा निधी

Web Title: Tyre pyrolysis factories in maharashtra no official data pollution board exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • maharashtra
  • pollution

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.