कोल्हापूर: शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या महामार्गाला समर्थन करणाऱ्या तसेच आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी .या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कोल्हापूर महापालिकेवर येऊन धडकला त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
सकाळी ११ वाजता भवानी मंडप ते महानगरपालिका असा मूक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये इंडिया आघाडी, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना समन्वय समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दारूबंदी संघर्ष समिती, सामाजिक संघटना कृती समिती,विद्यार्थी संघटना कृती समिती यांच्यासह सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरून सनदशीर मार्गाने विरोध नोंदवण्यात आला. या मोर्चात आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, सरोज पाटील, विजय देवणे, एस.डी लाड, सचिन चव्हाण, आर. के. पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक वक्तव्य केले असा आरोप ठेवून गिरीश फोंडे यांना ३ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित केले. त्याचबरोबर पाच एप्रिल च्या दौऱ्या अगोदर दोन दिवस शेतकऱ्यांची धर पकड करत त्यांना पोलीस कसीडीमध्ये ठेवले या विरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर त्यांच्यावर महायुती सरकारच्या आदेशावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच्या निषेधार्थ तसेच शक्तिपीठ विरोध करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा काढण्यात आला.
Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल
शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला
शेतजमिनी उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यातील बारा हजार शेतकरी आपल्या बायका मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार आजच्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला होता