स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्याबाबत चर्चा झाली.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होत असताना दुसरीकडं आता त्याच्या समर्थनार्थ देखील अनेक शेतकरी समोर येत आहेत.
शेतकर्यांचा विरोध असताना देखील आम. शिवाजीराव पाटील यांनी जनतेला विश्वासात न घेता ही अनाठायी व अवाजवी मागणी केली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? अशी विचारणा गडहिंग्लज उपविभागातील शेतकर्यांनी केली आहे
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील वक्तव्य केले आहे.
शक्तिपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे.
नुकतेच राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाचचे भूसंपादन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होताना दिसून येत आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन केले जाणार आहे. याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे.
cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता दिली.
कुणाची ही मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोसण्यासाठी हा महामार्ग होत आहे, त्यामुळे याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका शक्तिपीठ विरोधी कृती समितीने घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ५ एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक वक्तव्य केले असा आरोप ठेवून गिरीश फोंडे यांना ३ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता महसूल विभागाला याबाबत विचारून घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये त्यांच्या पैशाला आम्ही बोलणार नाही. आमची जमीन आम्ही देणार नाही, असा अवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.