Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजित पवारांबरोबर नाईलाजाने…; ‘या’ आमदारांच्या वक्तव्यांने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी अजित पवार यांना धक्का बसत आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नाईलाजाने अजित पवार यांच्यासोबत गेलो असे आमदार शिंगणे म्हणाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 18, 2024 | 11:04 AM
सांगलीत अजितदादा गटाला भगदाड; प्रदेशच्या पदाचा राजीनामा

सांगलीत अजितदादा गटाला भगदाड; प्रदेशच्या पदाचा राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणूकीपूर्वी पक्षांतर आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्यात सत्तातरांचे राजकीय नाटक रंगल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे ती निर्णायक ठरणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. अजिक पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरु केली तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे चुरशीचे प्रयत्न सुरु आहे. सध्या अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या एका आमदाराने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो?

बुलढाणा जिल्ह्यतील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं वक्तव्य केलं. राजेंद्र शिंगणे हे सध्या अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत. मात्र निवडणूकीपूर्वी त्यांनी अजित पवारांच्या पक्षाबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असे वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी थेट माध्यमांसमोर केले आहे. तसेच आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असे म्हटले आहे.

राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले,“गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

पुढे आमदार शिंगणे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असे मतही आमदार राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Sindkhed raja mla rajendra shingane reluctantly went with ajit pawar vidhan sabha elections nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
1

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

चर्चा तर होणार…! मनसेच्या बॅनरवर चक्क अजित पवारांचा फोटो; नेमकं घडतंय तरी काय?
3

चर्चा तर होणार…! मनसेच्या बॅनरवर चक्क अजित पवारांचा फोटो; नेमकं घडतंय तरी काय?

पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचा सर्व्हे समोर; तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात
4

पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचा सर्व्हे समोर; तब्बल ‘इतक्या’ जागा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.