
Vitthalrao Shinde Sugar Factory, Babandada Shinde, Sugar Factory FRP Rate
गत गळीत हंगामात कारखान्याकडून ऊस उत्पादक सभासदांना एकूण ३,१२५ रुपये ऊसदर मिळाला आहे. त्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने आणखी १०० रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात आल्याने सभासदांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
याचबरोबर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. सभासदांना साखर अर्ध्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बबनदादा शिंदे यांनी जाहीर केले. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे १०० रुपयांचा हप्ता आणि दुसरीकडे अर्ध्या किमतीत साखर मिळणार असल्याने सभासदांच्या कुटुंबांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
ऊस उत्पादक सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकरी सभासदांकडून स्वागत होत असून, बबनदादा शिंदे यांच्या घोषणेने दिवाळीपूर्वीच सभासदांना गोड बातमी मिळाली आहे.