
शेवगावच्या 'या' दोन कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
एकाच तालुक्यातील दोन कलावंतांना एकाच वेळी राज्य शासनाचे हे पुरस्कार मिळण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आशिष शेलार, सांस्कृतिक किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, सहसंचालक श्रीराम पांडे, ज्येष्ठ भारुड कलावंत तथा पुरस्कार निवड समितीच्या सदस्य चंदा तिवारी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे उपस्थित होते.
शेवगाव मधीलच प्रसिद्ध भारुड कलावंत हमीद अमीन सय्यद हे शिवशाहीर कल्याण काळे यांचे शिष्य असून, त्यांनी सुरुवातीच्या काळात कल्याण काळे यांना शाहिरी पोवाड्यासाठी गायन साथ दिली व अजूनही देत आहेत. संत एकनाथ महाराजांच्या सोंगी भारुडाची पारंपरिक लोककला त्यांनी जिद्दीने आत्मसात केली व गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रभर भारुडातून मनोरंजन व समाजप्रबोधन करीत आहेत. त्यांना भारुड गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारुड गायन स्पर्धेत त्यांना ‘राष्ट्रीय भारुड रत्न’ पुरस्काराने सम्मानित केले
आहे. धर्मा कांबळे यांनी यापूर्वी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील लोककला संमेलनात डक्कलवाराचे किंगरी वादन व बसव पुराण कथनाचे कार्यक्रम केले आहेत.
“मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
धर्मा कांबळे यांनी वडील व पारंपरिक डक्कलवार अमृता कांबळे यांच्याकडून किंगरी या वाद्याची निर्मिती करणे, मोर नाचविणे, मुजरा करणे व बसव पुराण कथन करण्याची पारंपरिक दुर्मीळ व नामशेष होत जाणारी लोककला कष्ट व मेहनतीने आत्मसात केली आहे. डक्कलवार ही मातंग समाजातील पोटजात असून, जुन्या बाडासह किगरी हे वाजवून आपली उपजीविका करण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे.