Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा मढीची कानिफनाथ यात्रा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामागील कारण म्हणजे मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत घातलेली बंदी. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 07:54 PM
मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात!

मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात!

Follow Us
Follow Us:
  • कानिफनाथ यात्रा यंदाही वादात अडकली
  • सलग दुसऱ्या वर्षी यात्रेत मुस्लिम व्यवसायिकांना विरोध
  • जाणून घ्या अधिक माहिती
पाथर्डी येथील कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना सलग दुसऱ्या वर्षी व्यवसायास बंदी घातल्याने मुस्लिम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांना राज्यातील काही हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या नेत्यांनी एकीकडे पाठिंबा दिला असताना दुसरीकडे मुस्लिम व्यावसायिकांनी या यात्रेत आपली दुकाने लावावी असा प्रयत्न पडद्याआड काहींनी चालवल्याने यावर्षीची यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच दहिसर-काशीगाव मेट्रोने प्रवास, मेट्रो लाईन ९ चा फडणवीस करणार उद्घाटन

मते व पुजारींऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी

मागील वर्षी संजय मरकड हे मढी देवस्थानचे अध्यक्ष व मढी गावचे सरपंच असल्याने त्यांना फारसा विरोध झाला नाही. मात्र, यावेळेस मढी देवस्थानचे विश्वस्त बदलले असल्याने या वादाला नकळत मढी देवस्थानविरोधात मढी ग्रामपंचायत असा वादाचा पदर जोडला गेला आहे.

दोन दिवसांपूर्वी मरकड यांनी पत्रकार परिषद घेत देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर ते मुस्लिम व्यावसायिकांना पाठबळ देत असल्याचा आरोप केला. या आरोपाचे विश्वस्त मंडळाने खंडण जरी केले नसले, तरीही त्यांनी मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत बंदी आहे, असे जाहीरसुद्धा केले नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 2) मढी येथे विविध हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा होत असून, या सभेतून मुस्लिम विरोध अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांची पाठराखण प्रांताधिकारी प्रसाद मते व पोलिस निरीक्षक विलास पुजारी करत असून, या अधिकाऱ्यांच्या जागी दुसरे अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करत प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत.

Iran Israel युद्धाचा भडका! Pune पोलिस सतर्क; शहरातील संवेदनशील ठिकाणांवर…

सभेत विरोध कायम

येत्या 19 मार्चला मढीची यात्रा पार पाडणार असून, या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना आपली दुकाने लावता येणार आहे की नाही याविषयी सध्या तरी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मागील यात्रेवेळी मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालावी यासाठी जी सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेस मंत्री नीलेश राणे, आमदार संग्राम जगताप व तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज शास्त्री उपस्थित होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. त्याच पद्धतीने काल मढी येथे सायंकाळी उशिरा झालेल्या सभेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास तीव्र विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवस्थान समिती व तालुका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Web Title: Ahilyanagar news opposition to muslim businessmen continues in madhi kanifnath yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Pathardi

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश
3

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.