Maharashtra Politics: मराठा आंदोलनाआधीच बीडमध्ये मोठी घटना; OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर...
बीड: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई सुरु केली आहे. आरक्षणासाठी मानवोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. २९ तारखेला ते मुंबईत धडक देणार आहेत. याच दरम्यान बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचे दिसून येत आहे. पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाल्याचे समजते आहे. पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याने हा वाद निर्माण झाल्याचे समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ही घटना घडली आहे.
हाके आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना आव्हान दिले होते. या ठिकाणी चौकात विजयसिंह पंडित यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले होते. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.
शरद पवार गटातील नेत्याची बोचरी टीका
राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये लाखो समर्थकांसह येण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके संताप व्यक्त करत आहेत. लक्ष्मण हाके यांच्यावर बीडमधील नेते शिवराज बांगर यांनी निशाणा साधला आहे.
Laxman Hake in Beed : “लक्ष्मण हाके हा राजकारणातला राखी सावंत…; शरद पवार गटातील नेत्याची बोचरी टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील प्रवक्ते व नेते शिवराज बांगर यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधला आहे. शिवराज बांगर म्हणाले की, “ओबीसींसाठीचे योगदान पाहता लक्ष्मण हाकेंला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही. कोणीही मनोज जरांगे पाटलांना स्पॉन्सर करावं एवढं काही आंदोलन ते लहान नाहीये. लक्ष्मण हाकेंला कोण स्पॉन्सर करतंय हे अख्या महाराष्ट्राने पाहिलंय लक्ष्मण हाके यांना पैसे घेताना लोकांनी पाहिलंय, ओबीसींच्या इतर नेत्यांवर टीका करताना लोकांनी पाहिलंय,” अशा शब्दांत शिवराज बांगर यांनी टीका केली आहे.