Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane crash: अजित पवारांसाठी ते विमान कुणी निवडलं, कुणाच्या सांगण्यावरून दौरा..? CID च्या तपासाला वेग

अजित पवारांच्या अपघात हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांसारख्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 07, 2026 | 09:22 AM
Ajit Pawar Plane crash: अजित पवारांसाठी ते विमान कुणी निवडलं, कुणाच्या सांगण्यावरून दौरा..? CID च्या तपासाला वेग
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तापस वेगाने सुरू
  • मंत्रालयातील अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सुमारे ४ तास कसून चौकशी
  • अजित पवारांच्या अपघात हा अपघात नसून घातपात असावा, अमोल मिटकरींचा संशय
Ajit Pawar Plane crash:  राज्याचे दिंवगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तापस वेगाने सुरू आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील शोधण्यास सुरूवात केली आहे. सीआयडीच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सुमारे ४ तास कसून चौकशी केली.

२८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन नेमके कोणी केले आणि विमानाची निवड कशी झाली, यावर सीआयडीने प्रश्नांची सरबत्ती केली. २७ जानेवारीच्या रात्री मंत्रालयात किंवा निवासस्थानी कोणत्या महत्त्वाच्या चर्चा झाल्या, याकडे तपासाचा मुख्य रोख होता. खासगी सचिवांकडून मिळालेली माहिती आणि विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ यातील तांत्रिक तपशीलांची आता सांगड घातली जाणार आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत राजकीय वर्तुळातून विविध शंका उपस्थित केल्या जात असल्याने, सीआयडी आता तांत्रिक बिघाड की घातपात, या दोन्ही शक्यतांची सखोल पडताळणी करत आहे. विमान जमीनीवर आदळण्या पूर्वी त्याचा मार्ग आणि त्यानंतर झालेले ५ स्फोट यांमधील विसंगती शोधण्याचे आव्हान आता सीआयडी’समोर असणार आहे.

 

घातपाताच्या दिशेनं तपास

अजित पवारांच्या अपघात हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय आमदार अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांसारख्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. या बाजूनेही CIDचा तपास सुरू आहे. अजित पवार यांच्या बारामती विमानतळावर झालेला अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही षडयंत्रातून त्यांच्या विमानाचा अपघात घडवून आणला असावा, याचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे काही निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा छडा लावण्यासाठी सीआयडीने आता तपासाची व्याप्ती वाढवली असून, हा तपास तीन महत्त्वाच्या टप्प्यांत विभागला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

तपासाचे तीन मुख्य टप्पे:

टप्पा १: तांत्रिक डेटा विश्लेषण विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box) ताब्यात घेऊन त्यातील डेटा तपासला जात आहे. यामध्ये विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान आणि वैमानिकांमधील शेवटच्या क्षणाचे संभाषण यांचे सखोल विश्लेषण केले जाणार आहे.

टप्पा २: फॉरेन्सिक तपासणी विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत (Lab) पाठवण्यात आले आहेत. तिथे आगीचे नेमके कारण आणि स्फोटाचे स्वरूप काय होते, याची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी केली जाईल.

टप्पा ३: अंतिम निष्कर्ष तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा बाह्य हस्तक्षेप (घातपात) यापैकी कोणत्या कारणाने अपघात झाला, याचा सविस्तर अहवाल सीआयडी तयार करणार आहे.

Web Title: Ajit pawar plane crash who selected that plane for ajit pawar the cid has started an investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
1

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच
2

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन
3

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब
4

NCP Politics: पटेल-तटकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट वादात; सुनेत्रा पवारांनी विचारला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.