Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप; चौकशीची मागणी

ऑनलाईन प्रक्रियेद्वारे संबंधित बीएलओंच्या माध्यमातून मतदारांची नावे समाविष्ट केली जात असल्याचा उल्लेख करत सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पडताळणीच्या प्रक्रियेवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 01:30 PM
अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप

अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप

Follow Us
Follow Us:

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीच्या शुद्धतेचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून, मतदार यादीतील कथित दुबार नोंदी, अनिवासी व्यक्तींची नावे आणि ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अन्य तालुक्यांतून येणाऱ्या अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

रेठरे बुद्रुक येथे ४ ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत सूर्यवंशी यांनी मतदार यादीतील नोंदींच्या पडताळणीचा मुद्दा उपस्थित केला. अनेक वर्षांपूर्वी विवाह होऊन सासरी गेलेल्या महिलांची नावे अद्याप मूळ गावाच्या मतदार यादीत कशी राहिली, तसेच काही कुटुंबांची किंवा व्यक्तींची नावे दुबार नोंदली गेली असतील तर त्याची कारणमीमांसा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादीत ‘शर्मा’, ‘वर्मा’, ‘शेट्टी’ यांसारखी आडनावे मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचा दावा करत, या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली. दुबार अथवा अपात्र नोंदी आढळल्यास त्यामागील कारणांची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाईन नोंदणीच्या प्रक्रियेवरही प्रश्न

ऑनलाईन प्रक्रियेद्वारे संबंधित बीएलओंच्या माध्यमातून मतदारांची नावे समाविष्ट केली जात असल्याचा उल्लेख करत सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पडताळणीच्या प्रक्रियेवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली. ऑनलाईन अर्जाच्या आधारे दुबार किंवा अपात्र नावे मतदार यादीत समाविष्ट होत असतील, तर संपूर्ण प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील कामगारांच्या नोंदी तपासा

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, कराड उत्तर यासह विविध भागांतून कामगार येत असतात. यातील जे कामगार केवळ रोजगाराच्या निमित्ताने कराड दक्षिणमध्ये ये-जा करतात आणि या मतदारसंघाचे कायमस्वरूपी रहिवासी नाहीत, त्यांच्या मतदार नोंदींचीही तपासणी व्हावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली.

मूळ गावातील मतदार नोंद कायम असताना कराड दक्षिण मतदारसंघात नाव नोंदविण्यासाठी काही कामगारांवर राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या चर्चेत तथ्य आहे किंवा नाही, याची निष्पक्ष चौकशी निवडणूक यंत्रणेने करावी, असे त्यांनी सांगितले.

मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा कणा 

मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. पात्र आणि प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांचीच नावे संबंधित मतदारसंघात असणे आवश्यक आहे. राजकीय फायद्यासाठी अनिवासी किंवा अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करण्याचा कोणताही प्रकार झाल्यास तो गंभीर विषय आहे, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारणार

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची पारदर्शक आणि निष्पक्षपणे पडताळणी करण्याची मागणी करत सूर्यवंशी यांनी, “कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळवा तसेच अन्य भागांतील अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास त्यावर तीव्र आक्षेप घेतला जाईल,” असा इशारा दिला. मतदार यादीत अनियमितता आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याबरोबरच आवश्यक ते सर्व कायदेशीर आणि लोकशाही मार्ग अवलंबून व्यापक लढा उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

Web Title: Strong objection if names of non resident workers appear in karad south voter list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?
1

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी
2

चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे
3

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

M K Stalin on CM Vijay: ‘तमिळनाडूत जोकर कॅबिनेटचा…’; मुख्यमंत्री विजयवर एम. के. स्टॅलिन यांचा थेट प्रहार, राजकीय वर्तुळात खळबळ
4

M K Stalin on CM Vijay: ‘तमिळनाडूत जोकर कॅबिनेटचा…’; मुख्यमंत्री विजयवर एम. के. स्टॅलिन यांचा थेट प्रहार, राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.