Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugercane FRP: कोल्हापूरात साखर कारखान्यांचा ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर

14 दिवसाच्या कालावधीत एफआरपी देयके अदा न केल्यास कलम 3(3अ) अनुसार विलंब कालावधी करीता 15  टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद आहे असे सहसंचालक गोपाळ मावळे यांनी नमूद केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 03, 2025 | 04:42 PM
Sugercane FRP: कोल्हापूरात साखर कारखान्यांचा ‘एफआरपी’प्रमाणे दर जाहीर
Follow Us
Close
Follow Us:
वारणानगर : कोल्हापूर जिल्ह्यातील 23 पैकी 22 साखर कारखाने सुरु झाले असून, गाळप हंगाम 2024-25 साठी ऊस दर (एफआरपी) जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली. जिल्ह्यात 16 सहकारी व 7 खासगी असे 23 साखर कारखाने असून, जवळपास सर्व कारखाने सध्या कार्यरत आहेत. या संदर्भात 15 नोव्हेंबर 2024 पासून राज्यातील गाळप हंगाम सुरू झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
ऊस बीलाच्या विलंबाची दखल:
ऊस (नियंत्रण) आदेश 1966 च्या तरतुदीनुसार, प्रत्येक साखर कारखान्याने गाळप झालेल्या ऊसाचे 14 दिवसांत एफआरपी दराप्रमाणे बील शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे. 14 दिवसांच्या आत बील न दिल्यास, आदेशाच्या कलम 3(3अ) नुसार विलंब कालावधीसाठी 15% व्याज आकारण्याची तरतूद आहे. मात्र, कारखान्यांनी उशिराने दिलेल्या ऊस बिलावर व्याज अदा केले का? याबाबत सखोल तपास करून संबंधित अहवाल साखर सहसंचालक कार्यालयाने तयार करणे गरजेचे आहे.
Big News: सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार, 300 जवानांचा जंगलाला वेढा

एफआरपी दर आणि कारखान्यांचे पालन:
21 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार, एफआरपीपेक्षा जास्त दर निश्चित करून गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांनी तो दर जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सर्व कारखान्यांनी एफआरपी प्रमाणेच पहिली एकरकमी उचल दिली असून, जादा दराबाबत हंगाम संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एफआरपी दर:

  • राजाराम बावडा: ₹3050
  • शेतकरी आजरा: ₹3100
  • छ. शाहू कागल: ₹3100
  • मंडलिक हमीदवाडा: ₹3100
  • इको केन चंदगड: ₹3100
  • संताजी बेलेवाडी: ₹3100
  • अथनी शुगर तांभाळे: ₹3100
  • दौलत हलकर्णी: ₹3100
  • ओलम चंदगड: ₹3100
  • दत्त शिरोळ: ₹3140
  • आवाडे हुपरी: ₹3150
  • शरद नरंदे: ₹3150
  • डॉ. डी. वाय. पाटील: ₹3150
  • गुरुदत्त टाकळी: ₹3150
  • भोगावती परिते: ₹3200
  • दूधगंगा बिद्री: ₹3200
  • ओंकार शुगर फराळे: ₹3200
  • ता. को. वारणा: ₹3220
  • उदयसिंह बांबवडे: ₹3220
  • कुंभी कुडीत्रे: ₹3300
  • पंचगंगा इचलकरंजी: ₹3300
  • दत्त दालमिया: ₹3300
  • नलवडे गडहिंग्लज: (जाहिर नाही)
वरील मुद्द्यांवर शासनाने वेळोवेळी दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
Chota Rajan News: 32 वर्षे फरार; छोटा राजनच्या टोळीचा राम पवार अटकेत

Web Title: Sugar factories in kolhapur announce prices as per frp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : चंदगड मतदार संघातील कारखान्यावर काटा स्वतः बसविणार शासनमान्य; आमदार शिवाजी पाटील यांचा इशारा
1

Kolhapur News : चंदगड मतदार संघातील कारखान्यावर काटा स्वतः बसविणार शासनमान्य; आमदार शिवाजी पाटील यांचा इशारा

Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी
2

Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

Kolhapur Politics :  कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू
3

Kolhapur Politics : कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र
4

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.