Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पंचगंगा नदीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का ? प्रदूषण मंडळाला नागरिकांचा संतप्त सवाल

पंचगंगा प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच नदीची पातळी खालावल्यामुळे पंचगंगेचे पाणी अधिक काळेकुट्ट बनले आहे. यामुळे नदी काठच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 12:39 PM
Kolhapur News : पंचगंगा नदीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का ? प्रदूषण मंडळाला नागरिकांचा संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  •  रसायनयुक्त, मैलायुक्त सांडपाणी थांबविण्याची मागणी
  • पंचगंगा नदीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का ?
शिरोळ, (वा.) पंचगंगा प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच नदीची पातळी खालावल्यामुळे पंचगंगेचे पाणी अधिक काळेकुट्ट बनले आहे. यामुळे नदी काठच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नदी प्रदुषणाला जबाबदार घटकांवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावल्यामुळे प्रशासनाच्यावतीने काही दिवसांपूर्वी नदी प्रवाहीत करण्यात आली होती. मात्र हे पाणी देखील दुषित पाण्यात मिसळून तेही पाणी प्रदुषित होत आहे.

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

केवळ नदी प्रवाहीत ठेवल्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न निकाली निघणार नसून या प्रदुषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पंचगंगेत मिसळणारे रसायनयुक्त, मैलायुक्त सांडपाणी थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कोरोना काळात कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली एमआयडीसी या भागातील सर्व प्रोसेस, कारखाने बंद असल्याने पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी मिसळत नव्हते. त्यामुळे काही महिने पंचगंगा नदीला स्वच्छ पाणी होते. त्यानंतर कोरोना संपल्यानंतर सर्व उद्योग सुरू झाल्यामुळे या उद्योगांचे रसायनयुक्त व मैला मिश्रित पाणी नदीत सोडले जात असल्यामुळे पंचगंगा पुन्हा प्रदुषित होत असल्याचे दिसून येते.

प्रदुषित पाण्यामुळे परिसरातील पिके व मानवी जीवन धोक्यात आल्याचे स्पष्ट
नदीने तळ गाठल्याने पाण्याअभावी ऊस व भाजीपाला, कोबी, टोमॅटो, दोडका, फ्लावर, उडीद, मूग ही पिके धोक्यात आली होती. शासनाने आता पंचगंगा नदी थोड्या प्रमाणात प्रवाहित केल्यामुळे शेतकरी वर्गांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुषित पाण्यातच हे पाणी मिसळले जात असल्यामुळे पुन्हा दुषित पाणीच नागरिकांच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे नदी प्रवाहीत करण्याबरोबरच प्रदुषणकारी घटकांवरही कारवाईची मागणी होत आहे.

प्रदूषणाचा मनुष्यासह जलचर प्राण्यांनाही मोठा धोका
या नदी प्रदुषणाचा मनुष्यासह जलचर प्राण्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. कायमच प्रदूषित राहिली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठत आहे त्यामुळे नदीतील जलचर यांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचरांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, गेली चार दिवस पंचगंगा नदीने तळ गाठला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरले होते. तर काही गावांचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

Web Title: Kolhapur news will action be taken against those polluting the panchganga river angry question from citizens to the pollution board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • kolhapur news
  • panchganga river

संबंधित बातम्या

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
1

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला
2

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
3

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
4

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.