Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price : साखरेच्या दरात तब्बल 25 टक्क्यांची घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा, सरकारनेही बदलले साठवणुकीचे नियम

Sugar Price : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशावर भार वाढला होता. मात्र आता कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात 25 टक्क्यांची घट झाली असून किरकोळ दरही कमी झाले आहेत. सरकारने मोठ्या खरेदीदारांसाठी साखर साठवणुकीची मर्यादा 15 वरून 30 दिवस केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 18, 2026 | 09:09 PM
Sugar Price : साखरेच्या दरात तब्बल 25 टक्क्यांची घसरण

Sugar Price : साखरेच्या दरात तब्बल 25 टक्क्यांची घसरण

Follow Us
Follow Us:
  • कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात सुमारे 25 टक्क्यांची घसरण
  • मोठ्या खरेदीदारांसाठी साठवणुकीची मर्यादा 15 वरून 30 दिवस
  • किरकोळ दरातही घट; ग्राहकांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता
 

Sugar Price : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली होती. या काळात साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता साखरेच्या बाजारातून काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारखाना पातळीवरील साखरेच्या दरात सुमारे 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे आगामी काळात किरकोळ बाजारातील दरही आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

मोठ्या खरेदीदारांसाठी साठवणुकीचा नियम बदलला

साखरेच्या बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने साखर साठवणुकीच्या नियमांमध्ये बदल केला आहे. मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या कंपन्यांसाठी साखर साठवण्याची मर्यादा आता 15 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

मात्र या अतिरिक्त साठ्यासाठी महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. 15 दिवसांपेक्षा अधिक साखर साठवायची असल्यास तो अतिरिक्त साठा केवळ आयात केलेल्या साखरेतून असणे आवश्यक आहे. यासाठी Advance Authorization Scheme आणि Tariff Rate Quota अंतर्गत खरेदी केलेली साखर ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या साखरेसाठी साठवणुकीची मर्यादा पूर्वीप्रमाणेच 15 दिवस राहणार आहे.

किरकोळ दरातही घट

ऑगस्ट महिन्यात साखरेचा किरकोळ दर सुमारे 65 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर हा दर आता सुमारे 58.50 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच किरकोळ दरात अंदाजे 10 टक्क्यांची घट झाली आहे.

मात्र कारखाना पातळीवर झालेली सुमारे 25 टक्क्यांची घट अद्याप पूर्णपणे ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांनी कारखाना पातळीवरील कमी दराचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

सणासुदीपूर्वी ग्राहकांना दिलासा मिळणार?

गणेशोत्सव, नवरात्र आणि आगामी सणांच्या काळात साखरेचा वापर वाढतो. त्यामुळे साखरेच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. कारखाना आणि घाऊक बाजारातील दरातील घट किरकोळ बाजारातही पूर्णपणे प्रतिबिंबित झाल्यास येत्या काळात साखर आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढलेल्या साखरेच्या दरामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Sugar price fall 25 percent sugar stock limit rules change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Sugar Market
  • Sugar Price

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.