Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विज्ञानवादी हाफकिनमध्ये ” रात्रीस खेळ चाले”, अंधश्रद्धेला बळी न पडणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची गरज!

वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि जनआरोग्याच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हाफकिन महामंडळात सध्या अंधश्रद्धा, संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 06:16 PM
Superstitious activities in Hafkin institute

Superstitious activities in Hafkin institute

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, नीता परब: वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि जनआरोग्याच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हाफकिन महामंडळात सध्या अंधश्रद्धा, संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र दिनी उलटा राष्ट्रध्वज फडकावल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर आता आणखी एका विचित्र प्रकारामुळे चर्चेत आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने मंगळवारी, १९ मे २०२६ रोजी महिंद्रकर यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास, ते राहत असलेल्या हाफकिन वसाहतीतील ‘राजयोग’ निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तीने लिंबू, टाचण्या आणि कुंकू ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीत आला. ही घटना घडली त्यावेळी घरी केवळ त्यांचा मुलगा हजर होता. हा प्रकार पाहून तो घाबरला आणि त्याने तत्काळ सुरक्षा रक्षकांसह इतरांना बोलावले. काही वेळातच महिंद्रकर यांच्या घराबाहेर ४० ते ५० जणांची गर्दी जमली. कुटुंबासोबत फिरण्यासाठी मुंबई बाहेर असलेल्या महिंद्रकर यांना सदर घटना कळताच, त्यांनी आपल्या मुलाला भोईवाडा पोलिस ठाणे गाठण्यास सांगत, प्रशासन अधिकाऱ्यांना देखील भाईवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र, दुसरीकडे भोईवाडा पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने न घेता ते साहित्य उचलून थेट कचऱ्यात फेकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विज्ञानवादी संस्थेत अंधश्रद्धेला घाबरून पोलिसांना बोलावलं ?

“हाफकिनसारख्या विज्ञानवादी संस्थेत अंधश्रद्धेला घाबरून पोलिसांना बोलावलं?” असा सवाल करत पोलिसांनी हसत- हसत घटनास्थळावरून निघून जाणे पसंत केल्याचे सांगण्यात येत आहे.

शासनाने केलेली बदली नि सीसीटिव्ही कॅमेरे ? हा गुंतागुंतीचा तिढा

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर महामंडळाच्या खर्चातून सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर रजा संपल्यानंतर २८ मे रोजी पुन्हा हाफकिनमध्ये रुजू होणार असून, घराबाहेर लिंबू ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी प्रशासन विभागाला सांगितल्याचे समजते.

‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

हाफकिन महामंडळाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे विज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक विचारांचा पुरस्कार करणारी संस्था, आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या भीतीने हादरलेले वरिष्ठ अधिकारी या विरोधाभासामुळे हाफकिन महामंडळाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आता हाफकिनला खऱ्या अर्थाने विज्ञानवादी, तर्कशुद्ध आणि अंधश्रद्धेला थारा न देणाऱ्या आयए एस अधिकाऱ्याची गरज असल्याची भावना कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. सपूर्ण प्रकाराबाबत हाफकिन महामंडळ संचालक सुनील महिंद्रकर यांच्याबरोबर संपर्क साधला असता , ते मुंबई बाहेर असल्या कारणास्तव संपर्क होऊ शकला नाही.

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, ग्राहकांसह व्यापारीही चिंतेत; वापरातील वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ

Web Title: Superstitious activities in hafkin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Haffkine Institute

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.