Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haffkine Tender Scam : हाफकिन महामंडळात टेंडर घोटाळ्याचा आरोप; भाई जगतापांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

Haffkine Tender Scam : हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनमधील टेंडर प्रक्रियेत कमिशनखोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 09:38 PM
Haffkine Tender Scam : हाफकिन महामंडळात टेंडर घोटाळ्याचा आरोप; भाई जगतापांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

Haffkine Tender Scam : हाफकिन महामंडळात टेंडर घोटाळ्याचा आरोप; भाई जगतापांनी मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • मुंबई विभागातील लेखा अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
  • दोषींवर कारवाई होणार, मंडळाचे स्पष्टीकरण
 

नीता परब, मुंबई

Haffkine Tender Scam : राज्य सरकारच्या अखत्यारीतील आधुनिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनमधील टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद सदस्य आमदार भाई जगताप यांनी केला आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. तसेच, याआधी मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही स्वतंत्र पत्र लिहून जाब विचारणा केली आहे.

नेमके प्रकरण काय?

एच. के. डेटा सर्व्हिसचे मार्केटिंग मॅनेजर संतोष धांडे आणि रफिक शेख यांनी 29 ऑक्टोबर 2026 रोजी हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये महामंडळाच्या मटेरियल मॅनेजमेंट विभागाचे अधिकारी उमेश वसंत पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
ट्रान्सपोर्टेशनच्या टेंडर प्रक्रियेदरम्यान स्वतःच्या मर्जीनुसार दर निश्चित करण्यास सांगणे, टेंडरच्या रकमेवर कमिशनची मागणी करणे आणि विविध टप्प्यांत रक्कम स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अन्य टेंडर प्रक्रियेतही आर्थिक मागणी केल्याचा आरोप असून, या व्यवहारांचे तपशील, व्हॉट्सॲप कॉल्स आणि संभाषणांचे डिजिटल पुरावे उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस

सभागृहातील आश्वासनाला केराची टोपली?

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना पाठवलेल्या पत्रात भाई जगताप यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मागील विधिमंडळ अधिवेशनात हाफकिनमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, या आश्वासनानंतर प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसून, संबंधित दोषी अधिकारी उमेश वसंत पवार याने पुन्हा गैरव्यवहार केल्याचे उघड होत आहे.
त्यामुळे विधिमंडळाच्या सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत १५ दिवसांत सादर करावयाच्या कारवाई अहवालाची सद्यस्थिती तातडीने तपासावी आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात यावी, ट्रान्सपोर्टेशन टेंडरसह सर्व निविदा प्रक्रिया, दरपत्रके आणि देयकांची सखोल तपासणी व्हावी, बँक व्यवहार व व्हॉट्सॲप संभाषणांसारखे डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत आणि प्रथमदर्शनी भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यास हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवून कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या आमदार भाई जगताप यांच्याद्वारे करण्यात आल्या आहेत.

तसेच तक्रारदारांना आवश्यक संरक्षण देऊन दोषींवर निलंबनासह कठोर विभागीय व फौजदारी कारवाई करावी, अशी आग्रही भूमिकाही भाई जगताप यांनी घेतली आहे. या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सचिवांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Mumbai FDA Action : पुन्हा मुंडेंच्या FDA चा दणका! चेतना, कॅफे आयडियल, नॅचरल्ससह दक्षिण मुंबईतील 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित

दोषींवर कारवाई होणार, मंडळाचे स्पष्टीकरण

हाफकीन महामंडळाचे संचालक रमेश चव्हाण यांना या प्रकरणा संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे ह्यात दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

संचालक काय कारवाई करणार?

मंगळवारी (17 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र राज्य कामगार विमा निगमच्या मुंबईतील कार्यालयातून लेखा अधिकारी जितेंद्र साखरकर याला लाचलुचपत विभागाने 50 हजाराची लाच घेताना अटक केल्याची घटना घडली आहे.
तर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य कामगार विमा निगमचे आयुक्त रमेश चव्हाण यांच्याकडे हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचा देखील अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. अशावेळी हाफकिन महामंडळातील सामूग्री व्यवस्थापक उमेश पवार यांच्यावर संचालक रमेश चव्हाण काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाफकिन महामंडळात कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: टेंडर प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार, कमिशनची मागणी आणि निविदेतील दर निश्चित करण्यासाठी दबाव आणल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

  • Que: हाफकिनमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी कोणी केली आहे?

    Ans: विधान परिषद सदस्य आणि आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

  • Que: तक्रारीत कोणत्या अधिकाऱ्याचे नाव आहे?

    Ans: हाफकिन महामंडळाच्या मटेरियल मॅनेजमेंट विभागातील अधिकारी उमेश वसंत पवार यांच्यावर तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत.

Web Title: Haffkine tender scam biopharma tender allegations bhai jagtap probe demand rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Arrested
  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Haffkine Institute

संबंधित बातम्या

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस
1

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव
2

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
3

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.