महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 13 तारखेला आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली होती. त्यावर सुनावणीसाठी कोर्टानं 17 मे रोजीची दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर आज कळणार आहे.
[read_also content=”पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचे पोलीस आयुक्तांना पत्र https://www.navarashtra.com/latest-news/mns-letter-to-commissioner-of-police-for-raj-thackerays-meeting-in-pune-280918.html”]